घरराजकारणमुन्नाभाईचा केमिकल लोचा आठवत राज ठाकरेंवर टीका

मुन्नाभाईचा केमिकल लोचा आठवत राज ठाकरेंवर टीका

बान्द्रा कुर्ला संकुल येथे आज उद्धव ठाकरे यांची बहुचर्चित मास्टर सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटाचा संदर्भ देत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर टीका केली. तर राज ठाकरे यांनी घेतलेल्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरूनही उद्धव ठाकरेंनी राज यांच्यावर हल्ला चढवला आहे.

लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटात नायकाला महात्मा गांधी दिसायचे. ते त्याच्याशी बोलायचे असा त्याला भास व्हायचा आणि त्यामुळे तो गांधीगिरी करायला लागला. हा चित्रपट एका सत्य घटनेवर बेतला आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. आताही तसेच बाळासाहेब दिसत आहेत आणि तो आता बाळासाहेबांप्रमाणे वागायला लागला आहे असे म्हणत उद्धव यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

हे ही वाचा:

निरुत्साहाची मास्टर सभा

माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

हिंदुत्वाच्या नावावर हिंदू संघटनांवरच टीका! कारसेवकांचाही अपमान

मुख्यमंत्री फडणवीस, सोमय्यांबद्दल बोलताना ‘घसरले’!

बाळासाहेबांसारखी शाल पांघरायले लागला आहे. आधी मराठी झालं, आता हिंदुत्वावर बोलायला लागले आहेत. पण मुन्नाभाई चित्रपटाच्या शेवटी हे लक्षात येतं की हा सगळा त्या नायकाच्या डोक्यातील केमिकल लोच्या होता असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे याला आता राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून काय प्रतिक्रिया मिळते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version