घरराजकारणउद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे 'काळू बाळूचा तमाशाच'

उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशाच’

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती.या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.उद्धव ठाकरे यांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीला ‘काळू बाळूचा तमाशा’ असल्याचे म्हटले आहे.चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

बावनकुळे ट्विट करत म्हणाले, ‘एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली.ही मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच. उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत’.

१. दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
२. ⁠१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?

हे ही वाचा:

काशीमध्ये २२ तास राहणार मोदी!

पावसाच्या व्यत्यतात कोलकात्याकडून मुंबईचा पराभव!

‘निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला लोकानुनयाची गरज नाही’!

सूर्यावर दोन मोठे स्फोट; पृथ्वीच्या संपर्क यंत्रणेला फटका बसण्याची शक्यता!

३. ⁠सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
४. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
५. ⁠उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान आहे की, हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत, महाराष्ट्रातील जनता या उत्तरांची वाट पाहत आहे.जय महाराष्ट्र!, असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version