घरक्राईमनामाआम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

आम्हाला गृहमंत्र्यांना पैसे द्यावे लागतात- पोलीस निरीक्षक

- Advertisement -

गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सोलापुरातील व्यापाऱ्याने केला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी पैसे मागितल्याचा आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. तरीपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांगमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान सुरु ठेवलं होतं. राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचं दुकान सील केलं आहे.

दरम्यान, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.

हे ही वाचा:

‘या’ सहा राज्यातून येणाऱ्यांना कोरोना चाचणी अनिवार्य

मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदींना पत्रातून काय लिहिले?

कोरोना आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही

मोदी सरकारकडून ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ सुरु

बार्शी पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं पोलीस निरीक्षकांनी सांगितलं.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version