घरस्पोर्ट्सपाकचा नन्ना मुन्ना, वय लपवून लावतोय चुना

पाकचा नन्ना मुन्ना, वय लपवून लावतोय चुना

पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावेळी मैदानावरील कामगिरी नव्हे, तर पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज अली रझा याच्या वयावरून क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे. गेल्या चार वर्षांत तब्बल पाच अंडर-१९ स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्याच्या वयाबाबत क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

अली रझाने २०२४ मध्ये झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत आपल्या प्रभावी गोलंदाजीने विशेष छाप पाडली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या युवा संघातील तो महत्त्वाचा गोलंदाज बनला. मात्र, त्याचा सलग अंडर-१९ स्पर्धांमधील सहभाग आता चर्चेचा विषय ठरला आहे.

विशेष म्हणजे, अली रझाने २०२४ चा अंडर-१९ विश्वचषक, त्याच वर्षीचा अंडर-१९ आशिया चषक, २०२५ चा अंडर-१९ आशिया चषक, २०२६ चा अंडर-१९ विश्वचषक आणि आता २०२६ च्या अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेतही सहभाग घेतला आहे. चार वर्षांच्या कालावधीत पाच मोठ्या अंडर-१९ स्पर्धांमध्ये खेळल्याने त्याच्या वयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सोशल मीडियावर काही चाहत्यांनी या प्रकारावर टीका करत पाकिस्तान क्रिकेट व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काहींनी तर याला वेगळ्या प्रकारची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. मात्र, अली रझाने वयात फेरफार केल्याचा कोणताही अधिकृत आरोप किंवा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. त्यामुळे केवळ सोशल मीडियावरील चर्चेच्या आधारे त्याच्यावर आरोप करणे योग्य ठरणार नाही. तरीही, अली रझाच्या वयाभोवती निर्माण झालेल्या या चर्चेमुळे पाकिस्तानच्या युवा क्रिकेटमधील वय पडताळणी प्रक्रियेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version