घरस्पोर्ट्सअनाहत सिंहचा ऐतिहासिक पराक्रम

अनाहत सिंहचा ऐतिहासिक पराक्रम

एशियन गेम्सच्या स्क्वॅश फायनलमध्ये पोहोचणारी पहिली भारतीय महिला

भारताच्या अनाहत सिंहने एशियन गेम्स २०२६ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत अनाहतने जपानच्या जागतिक क्रमवारीतील सहाव्या क्रमांकाच्या सातोमी वातानाबेवर ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवला.

सुरुवातीचे दोन्ही गेम ९-११, ११-१३ असे गमावल्यानंतर अनाहतसमोर मोठे आव्हान होते. मात्र तिने शानदार पुनरागमन करत तिसरा गेम १२-१० असा जिंकला. त्यानंतर चौथ्या गेममध्ये ८-६ अशी पिछाडी भरून काढत अनाहतने सलग पाच गुण मिळवले आणि गेम ११-६ असा जिंकत सामना २-२ असा बरोबरीत आणला.

निर्णायक पाचव्या गेममध्ये अनाहतने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत वातानाबेवर दबाव कायम ठेवला. अखेर तिने हा गेम ११-३ असा जिंकत सामना आपल्या नावावर केला आणि अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला.

या विजयासह एशियन गेम्सच्या महिला एकेरी स्क्वॅशच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत सिंह पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे तिचे पदक निश्चित झाले असून, आता तिच्यासमोर सुवर्णपदक जिंकण्याचे लक्ष्य असेल.

दरम्यान, मिश्र दुहेरीत जोशना चिनप्पा आणि वेलवन सेंथिलकुमार यांना हाँगकाँगच्या ली का यी आणि तांग मिंग हाँग यांच्याकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारतीय जोडीला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version