घरस्पोर्ट्सव्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून

व्हेरॉक कप क्रिकेट स्पर्धा २५ नोव्हेंबरपासून

१३ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचे दृष्टिकोनातून १३ वर्षाखालील मुलांच्या “व्हेरॉक कप” एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २५ नोव्हेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ दरम्यान होणाऱ्या ह्या स्पर्धेत यजमान व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमीच्या दोन संघासह ट्रीनिटी क्रिकेट अकॅडमी, ढोलेपाटील क्रिकेट अकॅडमी, जगदाळे स्पोर्ट्स फौंडेशन, सचिन झिमल क्रिकेट अकॅडमी, शिरुर स्पोर्ट्स अकॅडमी, क्रिकफिटनेट अकॅडमी, डी व्ही चॅलेंजर्स, स्पाईन स्टार क्रिकेट अकॅडमी, ऍथलिट्स क्रिकेट अकॅडमी,
ऑल स्टार क्रिकेट अकॅडमी, क्रिकेट नेक्स्ट अकॅडमी, स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट अकॅडमी, स्पेशल इलेव्हन क्रिकेट अकॅडमी
क्रिकनाईन अकॅडमी अशा नामांकित सोळा संघांना निमंत्रित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत

शेवटची विकेट पडत नाही तोपर्यंत हार मानू नका!

तेजस अपघातात हुतात्मा झालेले हवाई दलाचे विंग कमांडर नमांश सियाल कोण होते?

मालवणी पॅटर्नवरून मंत्री मंगलप्रभात लोढांना अस्लम शेखची धमकी

सुरुवातीला चार गटात साखळी सामने होतील व गुणानुक्रमे चार अव्वल संघांमध्ये उपांत्यफेरीचे सामने होतील. थेरगाव येथील मैदानावर २५ नोव्हेंबर २०२५ रोजी स्पर्धेचे उदघाटन होईल , स्पर्धेतील सर्व सामने थेरगाव येथे होतील. प्रत्येक सामना ४० षटकांचा असेल, प्रत्येक सामन्यातील योद्धा खेळाडू, सामनावीरांना व स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक व स्पर्धेतील मालिकावीर ठरलेल्या खेळाडूंना तसेच उपविजेता व विजेत्या संघाला चषक देऊन गौरविण्यात येईल.

अंतिम सामना १८ डिसेंबर २०२५ रोजी होईल, पारितोषिक वितरण १८ डिसेंबर २०२५ रोजी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते होईल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version