घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणआंदोलनजीवींना घेरी येईल हे आकडे पाहून... |

आंदोलनजीवींना घेरी येईल हे आकडे पाहून… |

हिंदू सणवाराच्या काळात देशात आंदोलनांचा धुडगूस घालण्याचे कारण लपून राहिलेले नाही. आंदोलनजीवींची रणनीती उघड आहे. त्यांना देशाच्या अर्थकारणाला धक्का द्यायचा आहे. सणावाराच्या काळात भारतीय जनतेचा खरेदी उत्सवही सुरू असतो. ही खरेदी अर्थकारणाचे इंधन बनते. इथेच कोलदांडा घातला तर त्याचे विपरीत परिणाम होतील, अर्थकारणाला झटका बसेल आणि त्याचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर फुटेल. हा गेमप्लान होता. तो उधळून लावला भारतीय जनतेने. आकडेच सांगतायत हे सत्य. देशात आंदोलनजीवी अराजक माजवण्यासाठी ताकद लावतायत. परंतु देशातील जनतेला कळून चुकलेले आहे, ही आंदोलने आपल्यासाठी नाहीत. ती राहुल गांधी आणि केजरीवाल यांची निर्मिती आहे. विदेशी शक्तींनी, भारतातील अनौरस विदेशी पिल्लांना हाताशी धरून, विदेशहित जपण्यासाठी केलेली आंदोलने आहेत. त्यामुळे आंदोलनांकडे दुर्लक्ष करून लोकांनी खरेदीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. केंद्रातील विद्यमान मोदी सरकारचा आत्मविश्वास सध्या शिखरावर आहे. हा आत्मविश्वास अर्थकारणाच्या मजबूतीतून निर्माण झाला आहे. तो खणखणीत परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून व्यक्त होतो आहे. अमेरिकेसारख्या देशालाही शिंगावर घेण्याची मानसिकता मोदी सरकारचे मंत्री सध्या दाखवताना दिसत आहेत. जिथे ट्रम्प यांना उत्तर दिले जाते तिथे राहुल गांधी वगैरे फुटकळ आहेत

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version