घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणएंटीलिया प्रकरण झाकण्याचे प्रयत्न होत आहेत का?

एंटीलिया प्रकरण झाकण्याचे प्रयत्न होत आहेत का?

एनआयए न्यायालयाने एंटीलिया प्रकरणातील आरोपी सचिन वाजे याला जामीन दिल्याच्या वृत्तामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. एंटीलियाखाली स्फोटके ठेवणे दहशतवादी कृत्यात मोडत नसल्याचा धक्कादायक निर्वाळा एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर करताना दिला. मुंबई उच्च न्यायालयाने आज एनआयएने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना वाजेच्या जामीनाला स्थगिती दिलेली आहे. अलीकडे दिशा सालियान आणि सुशांत सिंह प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू झालेली असताना माफीचा साक्षीदार होण्याची तयारी वाजेने दाखवली असल्याचा दावा केला जात होता. अशा परिस्थितीत वाजेला जामीन मिळाल्यास बरीच उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अराजकाचा पेटारा खुलण्याची शक्यता निर्माण झाली असताना मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास तरी ही शक्यता दफन केली आहे. डझनभर संवेदनशील प्रकरणांत सचिन वाजे यांचे नाव घेतले जाते आहे. एंटीलिया स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात त्याचा सहभाग सिद्ध झालेला आहे. अशा आरोपीला जामीन देऊन मोकाट सोडले तर त्याचा परिणाम अनेक प्रकरणांच्या तपासावर होऊ शकतो, असा विचार विशेष न्यायालयाने केलेला दिसत नाही. अलीकडेच हिट अँड रन प्रकरणात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर अब्जाधीश आरोपीला न्यायालयाने ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती. विशेष न्यायालयाने वाजेला जामीन देताना ज्या प्रकारे टिप्पणी केली ते पाहून पुन्हा ३०० शब्दांच्या निबंधाची आठवण झाली. अंबानी कुटुंबीयांच्या मनात वाजेला दहशत निर्माण करायची होती, परंतु अंबानी कुटुंबीयांच्या मनात खरोखरच भीती निर्माण झाली होती का, हे मान्य करता येत नाही, अशी धक्कादायक टिप्पणी विशेष न्यायालयात न्यायाधीश चकोर बाविस्कर यांनी केलेली आहे.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version