घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानसंजय राऊतांचा सूर कसा काय नरमला?

संजय राऊतांचा सूर कसा काय नरमला?

शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या निर्णयामुळे साऱ्या महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या आहेत. दुसरीकडे अजून एका घटनेमुळे महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या आहेत आणि ती घटना म्हणजे खासदार संजय राऊत यांनी ईडी चौकशीला जाण्याआधी दिलेली प्रतिक्रिया. संजय राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरूये. केंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या ईडीच्या कारभारावर संजय राऊत यांनी सत्तेत असताना सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र, आता चौकशीला सामोरे जात असताना संजय राऊतांचा सूर काहीसा बदललेला दिसून आला.

- Advertisement -

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version