घरविशेषधक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

धक्कादायक! महाराष्ट्रात दहा महिन्यांत २० वाघांचा मृत्यू!

आतापर्यंत दहा महिन्यांमध्ये देशात १०२ वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. शिकार, आपसातील झुंज आणि वीज प्रवाहाचा धक्का अशी वाघांच्या मृत्यूची प्रमुख कारणे आहेत. वाघांच्या मृत्यू संख्येत मध्य प्रदेश राज्याचा पहिला क्रमांक आहे, तर महाराष्ट्राचे स्थान दुसरे आहे. मागील वर्षी देशात १०६ वाघांचा मृत्यू झाला होता. देशभरातील २२ राज्यांच्या जंगलांमध्ये पुढील वर्षी व्याघ्रगणना होणार आहे.

हे वर्ष संपायला अजून दोन महिने शिल्लक आहेत. मात्र गेल्या १० महिन्यांत देशात १०२ वाघांच्या मृत्यूची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात नोंदविले गेले आहेत तर महाराष्ट्र २० आकड्यासह दुसऱ्या स्थानी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या व्याघ्रगणनेची तयारी आणि प्रशिक्षण सध्या सुरू आहे. बिबट्या, हत्तींसह व्याघ्रगणनेचा प्रयोग तंत्र शुद्धतेसह पहिल्यांदाच होत आहे. ही तयारी सुरू असताना चालू वर्षातील व्याघ्रमृत्यू हा चिंतेचा विषय ठरला आहे.

व्याघ्रप्रकल्पात सुरक्षा व्यवस्थेच्या नियोजनबद्धतेचा अभाव असल्याने शिकारी त्यात घुसखोरी करतात. मात्र त्यांचा प्रयत्न व्याघ्रप्रकल्पाबाहेरील वाघांवर असतो. तब्बल ३९ टक्के वाघ प्रकल्पाबाहेर असल्याने त्यांची सुरक्षा करण्याची गरज व्यक्त होत आहे. पण, यंदा ५२ टक्के व्याघ्रमृत्यू हे व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाले आहेत. १०२ पैकी ५३ मृत्यू हे व्याघ्रप्रकल्प व अतिसंरक्षित भागात झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये शिकारीच्या घटनांचा देखील समावेश आहे. त्यामुळे आता प्रकल्प व अतिसंरक्षित भागावर कठोर नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.

हे ही वाचा:

भाडेवाढीतून एसटीला मिळणार इतके कोटी

आयकर विभागानेही पूर्ण केले १०० कोटींचे टार्गेट

पूर्वीची सरकारे केवळ आपल्या कुटुंबाच्या तिजोऱ्या भरत होती

नवाब मलिक माझ्या मृत आईवर हल्ले करत आहेत

‘टीव्ही ९’ने दिलेल्या वृत्तानुसार वाघांच्या मृत्यू संदर्भात प्रमुख तीन कारणे पुढे आली आहेत. यात, अधिवासासाठी झालेला संघर्ष, शिकार आणि विद्युतप्रवाहाचा धक्का लागणे यांचा समावेश आहे. यंदा प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार वाघांचे सर्वाधिक मृत्यू मध्य प्रदेशात ३२ झाले आहेत, तर महाराष्ट्र २० झाले आहेत. कर्नाटकमध्ये १५, उत्तर प्रदेशमध्ये ९, आणि केरळमध्ये ६ अशी अन्य राज्यातील संख्या आहे.

पाच वर्षांतील देशातील व्याघ्रमृत्यू संख्या पुढीलप्रमाणे –

वर्ष २०१७– ११६ वाघांचा मृत्यू
वर्ष २०१८– १०२ वाघांचा मृत्यू
वर्ष २०१९– ९५ वाघांचा मृत्यू
वर्ष २०२०– १०६ वाघांचा मृत्यू
वर्ष २०२१ (आतापर्यंत) – १०२ वाघांचा मृत्यू

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version