घरविशेषअरुण योगीराज यांनी कोरलेल्या मुर्तीवरच अभिषेक होणार!

अरुण योगीराज यांनी कोरलेल्या मुर्तीवरच अभिषेक होणार!

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने दिला दुजोरा  

कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी कोरलेल्या प्रभू रामलल्ला मूर्तींवर अयोध्येतील राममंदिरात २२ जानेवारी रोजी अभिषेक करण्यात येणार आहे. त्याला अधिकृत दुजोरा श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने सोमवारी दिला.

हेही वाचा..

अयोध्या: कोण आहेत पंडित लक्ष्मीकांत दीक्षित ज्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी आहे संबंध!

एटीएम लुटण्यासाठी केला गॅस कटरचा वापर, चोरी करता आली नाही पण जाळून आले २१ लाख रुपये!

गिधाडेही आता बसणार रेस्टॉरन्टमध्ये!

देवरा यांच्या रूपात काँग्रेसमधील आणखी एक ‘वंशज’ गळाला

म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी साकारलेली प्रभू श्री रामाची मूर्ती अयोध्येच्या भव्य श्री राम मंदिरात स्थापनेसाठी निवडण्यात आली आहे. यामुळे कर्नाटकातील समस्त रामभक्तांचा अभिमान आणि आनंद द्विगुणित झाला आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने ‘रामलला’ ची मूर्ती कोरण्यासाठी निवडलेल्या तीन शिल्पकारांपैकी अरुण योगीराज यांचा समावेश होता.केदारनाथमध्ये स्थापित करण्यात आलेली आद्य शंकराचार्यांची मूर्ती आणि दिल्लीतील इंडिया गेटजवळ स्थापित केलेली सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा योगीराज यांनी साकारला आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version