घरविशेषवायुसेना प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, पाकविरोधी कारवाईला धार

वायुसेना प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची घेतली भेट, पाकविरोधी कारवाईला धार

मोदींशी झालेल्या या भेटीमुळे पाकविरोधातील कारवाईची पुन्हा चर्चा

- Advertisement -

भारतीय वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान निवासस्थानी झालेल्या या बैठकीत त्यांनी जवळपास ४० मिनिटे चर्चा करून महत्त्वाच्या विषयांची माहिती दिली. मोदींशी झालेल्या या भेटीमुळे पाकिस्तानविरोधी कारवाईच्या दृष्टीने आणखी एक पाऊल भारताने टाकल्याचे बोलले जात आहे.

याआधी शनिवारी (३ मे) नौदलप्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.
सध्याच्या संवेदनशील परिस्थितीत या दोन्ही भेटींना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे, विशेषतः जेव्हा गेल्या १० दिवसांपासून पाकिस्तान नियंत्रण रेषेवर सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा खून करण्यात आला. या हल्ल्यानंतर सुरक्षाबळांनी परिसराची व्यापक नाकेबंदी केली आहे आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, तीनही दलप्रमुख, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्या सोबत बैठक घेऊन सेनेला मोकळीक देण्याचा निर्णय घेतला होता.

हे ही वाचा:

देशभरात NEET UG परीक्षेसाठी प्रशासन सतर्क

एनडीएमध्ये जागावाटपावर कोणताही वाद नाही

मनोज तिवारींचा राहुल गांधींवर निशाणा

सीआरपीएफ मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्यानंतर पाकिस्तानी महिलेशी लग्न केले!

या कारवाईमुळे संतप्त झालेला पाकिस्तान गेल्या १० दिवसांपासून नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे. सेनेनुसार, ३-४ मेच्या रात्रीत देखील पाकिस्तानी सैन्य चौक्यांमधून गोळीबार झाला होता. भारतीय सैन्याने तत्काळ आणि अचूक प्रत्युत्तर दिले. कुपवाडा, बारामुल्ला, पुंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर या भागांमध्ये पाकिस्तानने छोट्या शस्त्रांद्वारे गोळीबार केला.

शस्त्रसंधी उल्लंघनासोबत पाकिस्तान भारतीय सेनेशी संबंधित संस्थांवर साइबर हल्ले करण्याचाही प्रयत्न करत आहे.
आत्तापर्यंत त्यांनी भारतीय लष्कराशी संबंधित शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्था आणि वेलफेअर संस्थांच्या वेबसाइट्सवर हल्ले केले आहेत. मात्र, भारतीय सायबर सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version