घरविशेषअजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर

अजय देवगणने ६० कोटीला घेतले नवे घर

असं म्हणतात की घर पाहावे बांधून म्हणजे माणसाची खरी कसोटी लागते. एकीकडे सर्वत्र आर्थिक टंचाई आणि तोट्यात धंदे असताना अजय देवगण याने मात्र जुहूमध्ये ६० करोडचे दुसरे घर घेतलेले आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना, देशासह राज्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. तरीही आपले हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत मात्र पैसे खर्च करण्यात कुठेही मागे नाहीत. आता हेच बघा आलिया भट, जान्हवी कपूर, ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, अजय देवगण यांनी घरांमध्ये काही करोडो घातलेले आहेत. अजय देवगण याच्या सेंकडहोमची किंमत अदमासे ६० करोड इतकी आहे.

५९० यार्डावर पसरलेला हा बंगला असून, याच्या आजूबाजूचे रहिवासी सुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार आहेत. ‘टाइम्स’ या वृत्तपत्राशी बोलताना अजय देवगण याने घर घेण्याच्या या माहितीस दुजोरा दिला. अजय देवगणने घेतलेल्या या नवीन घराच्या बाजूला ऋतिक रोशन, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र आणि अक्षय कुमार यांची घरे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या एक वर्षापासून अजय देवगण नवीन घराच्या शोधात आहे.

अजय देवगण याने हा बंगला ६० करोडांना खरेदी केला. महामारीच्या लाटेमुळे हा बंगला अजयला तब्बल ५ ते १० करोड कमी किंमतीत मिळाला आहे. सध्या या बंगल्यामध्ये देवगण कुटुंबियांनी अजून प्रवेश केला नाही. बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम मात्र वेगाने सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version