घरविशेषबारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामतीमध्ये विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू

बारामती विमानतळाजवळ लँडिंग दरम्यान झाला भीषण अपघात

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बुधवार, २८ जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीला जात असताना विमानाला झालेल्या अपघतात त्यांचा मृत्यू झाला. बारामती विमानतळाजवळ लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर राज्यात शोककळा पसरली आहे.

अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक हे विमानात होते. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) ने विमान अपघातात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.

हे ही वाचा:

बारामतीत लँडिंग दरम्यान विमानाला अपघात; अजित पवार गंभीर जखमी

वडाळ्यात उभारली १५ फुटी तलवार; बिलाली फाउंडेशनचा उद्योग

पंडवानी गायिका प्रभा यादव, सुप्रसिद्ध चित्रकार चिंतामणी हसबनीस यांना भरतमुनी सन्मान

हिमालयाएवढ्या उंच महापुरुषांना छोटे करू नका रे!

अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी म्हणून बारामती येथे जात होते. त्यांच्या या भागात प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या होत्या यासाठी ते विमानाने जात होते. बारामती विमानतळाजवळ विमान लँडिंग होत असतानाच विमानाचा अपघात झाला आणि ते विमान जवळच्या शेतात कोसळले. हा अपघात भीषण स्वरुपाचा होता. विमान कोसळल्यानंतर हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. तसेच विमानाचेही मोठे नुकसान झाले आहे. विमानाच्या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version