घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करणाऱ्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करणाऱ्या चित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन

भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयांतर्गत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, १५ जनपथ रोड, नवी दिल्ली येथे विवेकानंद यूथ कनेक्ट फाउंडेशन यांच्या प्रकल्पाचे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक डॉ. राजेश सरवडण्य यांनी दिली. “Celebrating Leadership, Vision and Service through Art” या आमच्या प्रकल्पांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिमत्त्व, नेतृत्व, दूरदृष्टी आणि सेवाभाव यांचा गौरव करणारी ६० हून अधिक विशेष चित्रे सादर करण्यात येणार आहेत.

२०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेले DAIC हे केंद्र संशोधन, विश्लेषण आणि धोरणनिर्मितीच्या माध्यमातून सामाजिक-राजकीय आणि आर्थिक विषमता कमी करण्याचे ध्येय बाळगते. आमचा प्रकल्प या ध्येयाशी सुसंगत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

हेही वाचा..

इंडिगो विमानाला पक्षी धडकला

‘पंजाब तुमचे एटीएम नाही, आधीच तुमच्या ऐषोआरामावर कोट्यवधी रुपये वाया गेलेत’

भारताशी असलेल्या संबंधांचा ६०व वर्धापनदिन; सिंगापूरचे पंतप्रधान येणार भारतात!

‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’: स्वदेशीसाठी भाजपचा तीन महिन्यांचा उपक्रम!

प्रदर्शनाची तारीख : १७-२१ सप्टेंबर २०२५, स्थळ : डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र, १५ जनपथ रोड, नवी दिल्ली, प्रकल्प घटक : कॉफी टेबल बुक, संकेतस्थळ आणि चित्रप्रदर्शन, थीम : Celebrating Leadership, Vision and Service through Art. हा प्रकल्प कलावंतांना आपली प्रतिभा सादर करण्याची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपलेल्या नेतृत्व, दूरदृष्टी आणि सेवाभाव या मूल्यांचा प्रसार करण्याची एक सुंदर संधी आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version