घरविशेषआनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो  

आनंद महिंद्रा म्हणतात, ती जीप मला द्या; मी बोलेरो देतो  

मुलाची गाडीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मराठमोळ्या इंजिनियरने एक अनोखी गाडी तयार केली आहे. त्यांनी तयार केलेल्या गाडीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला होता. ही गाडी पाहून उद्योजक आनंद महिंद्रा देखील थक्क झाले. त्यांनी या गाडीचा व्हिडीओ पोस्ट करत गाडीच्या मालकाला अनोखी ऑफर दिली आहे. त्यानुसार ही जीप महिंद्राच्या संग्राहालयात ठेवण्यात येणार आहे.

दत्तात्रय लोणकर यांनी बाईकचे इंजिन, रिक्षाचे टायर आणि जीपचे काही पार्ट्स वापरुन ही अनोखी गाडी तयार केली आहे. विशेष म्हणजे ही जीप किक मारून सुरु करता येते. ही कलात्मकता आनंद महिंद्रा यांना प्रचंड आवडली आहे. त्यांनी लोणकर यांचे कौतुक केले आहे.

हे ही वाचा:

ओमिक्रोन विरुद्धच्या लढाईसाठी मोदींची ‘पंचसूत्री’

ठाकरेंची एन्ट्री, राणेंचे ‘म्याव म्याव’

लुधियाना जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट

पेंग्विन बाळाच्या बारशात मश्गुल असणाऱ्यांना बालमृत्युंचे सोयरसुतक नाही!

आनंद महिंद्र यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘स्थानिक प्रशासन कदाचित नियमात बसत नसल्याने ही गाडी रस्त्यावर चालवू देणार नाही. त्यामुळे या गाडीच्या बदल्यात मी स्वतः या व्यक्तीला बोलेरो गाडी देऊ इच्छितो. त्याचा हा आविष्कार महिंद्रा रिसर्च व्हॅलीत प्रदर्शनासाठी ठेवला जाईल. जेणेकरून कमीत कमी संसाधनात चांगले काहीतरी बनवण्याची आपल्याला प्रेरणा मिळेल,’ अशा आशयाचे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केले आहे.

आनंद महिंद्रा हे समाज माध्यमांवर नेहमीच सक्रीय असतात. अनेक विषयांवर, मुद्द्यांवर ते आपली मते मांडत असतात. नवीन कल्पनांना, अविष्कारांना अनोख्या पद्धतीने पाठींबा दर्शवत असतात.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version