घरविशेषराष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा

राष्ट्रीय स्मारकासाठी पुण्यातील भिडेवाडा इतिहासजमा

पोलीस बंदोबस्तात महापालिकेकडून कारवाई

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात देशातली पहिली मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा सुरू केलेला भिडेवाडा सोमवार, ४ डिसेंबर रोजी रात्री पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आला. आता त्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होणार आहे. भिडेवाडा हा शहराच्या मध्यवस्तीत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असल्याने महापालिकेने रात्री अकरानंतर वाडा पाडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रात्री पोलीस बंदोबस्तात वाडा पाडल्याने अखेर भिडेवाडा इतिहासजमा झाला आहे.

भिडे वाड्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता. हा सुरू असलेला खटला पुणे महापालिका आणि राज्य सरकारने जिंकला होता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठ परिसरातील भिडे वाड्यात मुलींसाठी देशातली पहिली शाळा सुरू केली होती. त्यामुळे या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. या वाड्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली होती. त्याला पुणे महापालिका आणि राज्य सरकारनेही अनुकूलता दर्शवली. मात्र, १३ वर्षे हे प्रकरण न्यायालयात अडकले होते. या वाड्यासंदर्भातील स्थानिक रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली होती.

हे ही वाचा:

तीन राज्यांमधील खासदार खासदारकी सोडणार?

ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहाच्या चीफ मेडिकल ऑफिसरला अटक

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

‘मिचॉंग’ने चेन्नईला झोडपलं; ३३ विमाने बंगळूरूकडे वळवली तर १४४ रेल्वे गाड्या रद्द

१३ वर्षे या स्मारकासाठी संघर्ष करावा लागला. याबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना दंड का करू नये, अशी विचारणा करतानाच एक महिन्यामध्ये जागा रिकामी करून ती महापालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता भिडेवाडा हा इतिहासजमा झाला आहे. आता या ठिकाणी स्मारक होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version