घरविशेषदक्षिण मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

दक्षिण मुंबईत पाच मजली इमारत कोसळली

- Advertisement -

दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरात एका पाच मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. आज सकाळी ७:३० च्या सुमारास ही घटना घडली. ही म्हाडाची  इमारत असल्याचं सांगण्यात येत आहे. या इमारतीतून रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत ३४ लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. याशिवाय ५ जण इमारतीच्या मलब्याखाली अडकल्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईतील फोर्ट हा उच्चभ्रू परिसर आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

बचाव पथकाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केलं असून, नागरिकांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत दुरुस्तीचं काम सुरु होतं. ही इमारत काही वर्ष जुनी आहे. त्यामुळे आतल्या बाजूने डागडुजी सुरु होती. ही म्हाडाची इमारत असून, जिथे डागडुजी सुरु होती, तिथेच पडझड झाल्याची माहिती मिळत आहे.

या इमारतीचा तिसरा आणि चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पडझड सुरु होताच ३४ रहिवाशांना तातडीने बाहेर काढण्यात आलं. ते सर्व नागरिक सुखरुप आहेत. कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

हे ही वाचा:

अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीची धाड

कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा घट

दि. बा. पाटील नाव द्या, नाहीतर विमानतळाचे काम चालू देणार नाही

‘लुटा आणि वाटून खा’ हा महाविकास आघाडीचा एक कलमी कार्यक्रम

सध्या मुंबईत पावसाचा जोर नसला तरी जुन्या इमारतींना धोका कायम आहे. नुकतीच येऊन गेलेली वादळं, जोरदार पाऊस यामुळे जुन्या इमारतींचे काही भाग कोसळल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. मुंबई महापालिकेकडून जुन्या आणि धोकादायक इमारतींना नोटीस पाठवून, त्या रिकाम्या करण्याचे आदेश दिले जातात. आता ज्या इमारतीचा भाग कोसळला आहे, त्या इमारतीला अशा काही सूचना दिल्या होत्या का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version