कॅन्सरच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) कॅन्सरवरील ५४३ औषधांच्या ब्रँड आणि पॅकच्या किमतींमध्ये बदल केले आहेत. यापैकी ३९७ औषधांचे दर कमी करण्यात आले असून, २१७ औषधांच्या किमती निम्म्यापेक्षाही कमी झाल्या आहेत. नव्या किमती ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत. उपचारांचा वाढता खर्च लक्षात घेता, या निर्णयामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
या दरकपातीमध्ये काही महागड्या औषधांच्या किमती मोठ्या प्रमाणात घटल्या आहेत. सॅमटेपा इंजेक्शनची किंमत ८०,०७१ रुपयांवरून थेट ७,१५० रुपयांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे या इंजेक्शनच्या किमतीत ७२,९२१ रुपयांची घट झाली आहे. त्याचप्रमाणे, पॅल्बोप्रो औषधाच्या २१ कॅप्सूलच्या पॅकची किंमत ४०,४२१ रुपयांवरून २,७२० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ५ लाख कोटींची भर
संजय राऊतांनी आधी स्वतःच्या उमेदवारांचा हिशेब द्यावा
मीनाक्षी शिंदेंचा महिला आघाडी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी विकासदर ७.३५% राहण्याचा अंदाज
एकूण ९७ औषधांच्या किमतींमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक, तर ५० औषधांच्या किमतींमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त कपात झाली आहे. पाच औषधांच्या किमती ९० टक्क्यांपेक्षाही अधिक कमी करण्यात आल्या आहेत. मात्र, १४६ ब्रँड आणि पॅकच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. सरकारने १३७ कॅन्सरविरोधी औषधांच्या व्यापार मार्जिनवर कमाल किरकोळ किमतीच्या (MRP) ३० टक्क्यांची मर्यादा घातली आहे.
दरम्यान, औषधांच्या किमतींमधील मोठ्या तफावतीवर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. १३ हजार रुपयांचे इंजेक्शन एक लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीला विकले जात असल्याचा मुद्दाही न्यायालयात मांडण्यात आला होता. औषधांच्या किमती आणि कंपन्यांच्या नफ्याबाबत सुरू असलेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. आता नव्या दरांचा लाभ प्रत्यक्षात कॅन्सरच्या रुग्णांना कितपत मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.
