घरविशेषकोलकाता : हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयचा छापा !

कोलकाता : हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयचा छापा !

भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई

कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणी चौकशी सुरु असलेल्या हॉस्पिटलच्या माजी प्राचार्याच्या घरी सीबीआयने छापा टाकला आहे. सीबीआयने रविवारी (२५ ऑगस्ट) आरजी कार मेडिकल कॉलेजचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्या घरासह १५ ठिकाणी छापा टाकून झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आरजी कार हॉस्पिटलमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संदीप घोष यांच्यासह अन्य दोन डॉक्टरांच्या घरी सीबीआयचे लाचलुचपत प्रतिबंधक पथक पोहचल्याची माहिती आहे. यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. देबाशिष सोम आणि हॉस्पिटलचे माजी एमएसव्हीपी संजय वशिष्ठ यांचा समावेश आहे.

रुग्णालयाचे माजी उपअधीक्षक अख्तर अली यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. संदीप घोष यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप अख्तर अली यांनी याचिकेत केला होता. यानंतर सीबीआयने कारवाईला सुरुवात केली. उच्च न्यायालयाने यापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि आता भ्रष्टाचाराचा तपासही केंद्रीय एजन्सीकडे वर्ग केला आहे. उच्च न्यायालयाने सीबीआयला तीन आठवड्यांत तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा :

“मविआचे सरकार गडगडायला नाना पटोले जबाबदार”

टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरोव यांना अटक

आशिष शेलारांच्या पीएच्या नावाने फसवणूक करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मध्यप्रदेश; ब्लकमेल करून अत्याचार करणाऱ्या नफीजच्या घरावर बुलडोजर !

दरम्यान, या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय याची आज पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने न्यायालयीन कोठडीतच त्याची पॉलीग्राफ चाचणी होणार आहे. या प्रकरणी अन्य सहा जणांची चौकशी सीबीआय करत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version