घरविशेषबुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!

बुद्धिबळ स्टार प्रज्ञानंद आणि वैशालीने केली कमाल!

भारताची तिसरी महिला ग्रँडमास्टर

जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या प्रज्ञानंदपाठोपाठ त्याची बहीण वैशालीनेही बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे. बुद्धिबळाच्या इतिहासात ग्रँडमास्टर किताब मिळवणारे ते पहिलेच बहीण-भाऊ ठरले आहेत.

वैशालीने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला तिसरा नॉर्म ऑक्टोबरमध्ये झालेल्या कतार मास्टर्स स्पर्धेतच पूर्ण केला होता. मात्र तिचे एलो गुणांकन २५००पेक्षा कमी होते. त्यामुळे ग्रँडमास्टर किताबासाठी तिला हा टप्पा गाठणे आवश्यक होते. स्पेनमधील एल्लोब्रेगात स्पर्धेत शुक्रवारी तिने केलेल्या कामगिरीमुळे तिचे ‘लाइव्ह रेटिंग’ २५०० झाले आणि तिने ग्रँडमास्टर किताबावर नाव कोरले.

२० वर्षांची वैशाली ही हा किताब मिळवणारी अवघी तिसरी भारतीय महिला आहे. याआधी हा किताब कोनेरू हम्पी आणि हरिका द्रोणावल्ली यांनी मिळवला आहे. ११ वर्षांनंतर भारतीय महिला ग्रँडमास्टर झाली आहे. वैशाली आणि प्रज्ञानंद या दोघांना वयाच्या विशीत येण्यापूर्वीच हे यश मिळाले आहे.

हे ही वाचा:

अमित शहा म्हणाले, ‘अवघ्या पाच मिनिटांत कारागृह व्यवस्थापन मंत्र्याचा कैदी झालो’

भाजपाची राजस्थानात मुसंडी, मध्य प्रदेशातही संपूर्ण बहुमताकडे

आरिफ बनला वीर… हिंदू मुलीवर बलात्कार, धर्मांतर, गर्भपात

एक अकेला, सब पर भारी’ स्मृती इराणीकडून ट्विट!

या कामगिरीमुळे वैशालीवर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. वैशाली ही भारताची ८४वी ग्रँडमास्टर ठरली आहे. या वर्षी ग्रँडमास्टर किताब मिळवणारी वैशाली ही दुसरी महिला आहे. यापूर्वी चीनच्या झू जिनर हिने हा किताब मिळवला आहे.

दुसरी भारतीय भावंडे

भारताचा विघ्नेश एन. आर. हा भारताचा ८०वा ग्रँडमास्टर ठरला होता. या वर्षाच्या सुरुवातीला विघ्नेशने हा किताब मिळवला होता. विघ्नेश आणि विशाख ही ग्रँडमास्टर किताब मिळवणारी पहिलीच भारतीय भावंडे ठरली होती. विशाख याने २०१९मध्ये ग्रँडमास्टर किताब मिळवला होता. तो भारताचा ५९ वा ग्रँडमास्टर ठरला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version