घरविशेष'व्होटजिहाद विरुद्ध धर्मयुद्ध विजयी'

‘व्होटजिहाद विरुद्ध धर्मयुद्ध विजयी’

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असून मविआपेक्षा महायुती वरचढ असल्याचे चित्र आहे. महायुती २०० हून अधिक तर भाजपा १२५ हून अधिक जागांवर विजयी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांचे वक्तव्य समोर आले आहे. ‘व्होटजिहाद विरुद्ध धर्मयुद्ध विजयी’ असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, व्होट जिहादसाठी राहुल गांधी, उद्धव ठाकरे यांनी मालेगावमध्ये जे पैसे पाठवले होते, आतापर्यंत ईडीने ३६३ करोड रुपये परत मिळविले आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या कोविड घोटाळ्याचा आणि त्यांच्या घमंडचा परभव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’ हा नारा दिला होता. मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले, ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले, ‘व्होट जिहाद विरुद्ध धर्मयुद्ध’. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणाऱ्या महाराष्ट्राने व्होट जिहादला कसे रोखता येईल हे प्रत्यक्ष दाखवून दिले आहे.

हे ही वाचा : 

राज्यात आता ‘अल्लाह हु अकबर’ नाहीतर ‘जय श्री राम’चा नारा!

भाजपा १२५ जागांवर विजय मिळवेल, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील!

२० हजार अतिरिक्त निमलष्करी दलाचे जवान मणिपूरमध्ये तैनात

नक्षलवादावर शून्य सहनशीलता; वर्षभरात २०७ नक्षलवाद्यांचा खात्मा

 

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version