घरविशेषकर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या

कर्नाटकमध्ये भाजप नेत्याच्या मुलासह चौघांची हत्या

कर्नाटकातील गदग-बेतागेरी शहरात भाजप नेते आणि पालिकेचे उपनगराध्यक्ष सुनंदा बकाले यांच्या मुलासह चौघांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवार, १९ एप्रिल रोजी हा प्रकार घडला. कार्तिक बकले, परशुराम हादिमानी आणि त्यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांची लहान मुलगी आकांक्षा अशी मृतांची नावे आहेत.
यातील कार्तिक हा सुनंदा बकाले यांचा मुलगा आहे. कार्तिकचे वडील प्रकाश बकाले हे सुद्धा पूर्वी पालिकेचे उपनगराध्यक्ष होते.
१७ एप्रिल रोजी कार्तिकचा साखरपुडा झाला होता. हादिमानी कुटुंबीय या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी कोप्पा येथून गदग बेतागेरी येथे आले होते. या चौघांची हत्या झोपेत असताना झाल्याचे आढळून आले.
या प्रकरणाबाबत बोलताना एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “मारेकरी पहिल्या मजल्यावरून खोलीत घुसले आणि परशुराम, लक्ष्मी आणि आकांक्षा यांची हत्या केली. मोठा आवाज ऐकून कार्तिक पहिल्या मजल्यावर काय झाले हे पाहण्यासाठी गेला तेव्हा त्याचीही हत्या करण्यात आली.

हेही वाचा..

लोकसभा निवडणुकीनंतर आम्ही ७०० नवीन मदरसे उघडू

राजस्थानमध्ये वऱ्हाडांच्या कारला अपघात, ९ जणांचा मृत्यू!

उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना शिंदेकडून लोकसभेसाठी ऑफर?

‘रेहान बीफ शॉप जिंदाबाद, कत्तल करत रहा’

बकाले कुटुंब तळमजल्यावर तर हादिमानी कुटुंब वरच्या मजल्यावर झोपले होते. मोठा आवाज आल्याने बकालेंनी पोलिसांनी तत्काळ फोन करून बोलावले. घटना घडल्यानंतर मारेकऱ्यानी तेथून लगेच पळ काढला. खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार तेथील एका खड्यात टाकून दिले. पोलिसांनी दरोड्याच्या उद्देशाने हत्या होण्याची शक्यता नाकारली आहे. आरोपींना पकडण्यासाठी ५ जणांचे पथक तयार करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version