घरविशेषविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानिमित्त गुगलचे खास डुडल

डुडलमध्ये पिच, स्टंप्ससह क्रिकेटच्या मैदानाचे दृश्य

विश्वचषक स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याकडे सर्वच क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. जगभरात या सामान्यासाठी उत्साह दिसून येत असून त्यानिमित्ताने गुगलने देखील खास डुडल तयार केले आहे.

या डुडलमध्ये गुगलने पिच, स्टंप्ससह क्रिकेटच्या मैदानाचे दृश्य दाखवले आहे. सीमारेषा, प्रेक्षक, आकाश आणि फटाक्यांची आतषबाजी हे देखील त्यात दाखवले आहे. त्यासोबतच आकाशही दाखवण्यात आले आहे. शिवाय वेगळ्या पद्धतीने क्रिकेटचे साहित्य वापरून गुगल लिहिण्यात आले आहे.

गुगल डुडलमध्ये वर्ल्डकप ट्रॉफी गुगलच्या दुसऱ्या O मध्ये दिसत आहे, तर गुगल शब्दात L च्या जागी बॅट दिसत आहे. गुगल डुडलवर क्लिक करताच गुगल तुम्हाला एका नव्या पेजवर घेऊन जातो, जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या फायनल मॅचशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती अपडेट केली जात आहे.

हे ही वाचा:

मुंबईकर ते हिटमॅन! भारताचा कर्णधार रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याकडून आयुष्यभराची संपत्ती राम मंदिराला दान

‘खर्गे यांनी माझ्या मृत वडिलांबद्दल अपशब्द वापरले’

मणिपूरमध्ये स्वतंत्र सरकार स्थापन करण्याची धमकी देणारा मुआन टॉम्बिंगविरुद्ध गुन्हा

यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताने आपल्या जबरदस्त कामगिरीने समोरच्या प्रत्येक संघावर वर्चस्व गाजवले आहे. एकदिवसीय सामन्यात दोन्ही संघ आतापर्यंत एकूण १५० वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने ५७ आणि ऑस्ट्रेलियाने ८३ सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये विश्वचषकाचे १३ सामने झाले. त्यात भारताने पाच, तर ऑस्ट्रेलियाने आठ वेळा विजय मिळवला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version