घरविशेषआयईएस, बांद्रा ज्युनियर महाविद्यालयाला विजेतेपद

आयईएस, बांद्रा ज्युनियर महाविद्यालयाला विजेतेपद

जिल्हा क्रीडा क्रिकेट स्पर्धेत नागपूर महाविद्यालयावर केली मात

क्रीडा विभागामार्फत आयोजित जिल्हा क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरावर बांद्रा येथील आयईएस ज्युनियर महाविद्यालयाने विजेतेपद पटकाविले. नागपूरच्या संघावर ३३ धावांनी विजय मिळवत हे विजेतेपद पटकाविले. या विजयामुळे बांद्रा येथील आयईएस ज्युनियर महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत स्थान मिळविले आहे.  १९ ते २१ एप्रिल या कालावधीत ओव्हल येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

गौतमीचा हल्लागुल्ला अजितदादांचा सल्ला

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

बंगल्याच्या नूतनीकरणासाठी ४५ कोटींचा खर्च करणारे केजरीवाल हे ‘महाराज’

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

२० षटकांच्या या सामन्यात आयईएस ज्युनियर महाविद्यालयाने १९.३ षटकांत सर्वबाद १२३ धावा केल्या. त्यात आदित्य पाबलकरने ३९ धावा केल्या तर फरदीन शेखने ३ बळी घेत आपल्या संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. नागपूरच्या एसआरएचएस ज्युनियर महाविद्यालयाला मात्र १९ षटकांत केवळ ९४ धावांपर्यंत मजल मारता आली.

संघाच्या या यशात महाविद्यालयाच्या संघप्रशिक्षक शशांक सामंत, महाविद्यालयाच्या प्रभारी ममता सिंग, काव्या परुळेकर, पद्मिनी पवार आणि  क्रीडा प्रमुख समीर मयेकर यांचे योगदान आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version