घरविशेषभारतीय कंपनी हिकल राफेल विमानाच्या कंट्रोल सिस्टीमसाठी बनवणार महत्त्वाचे घटक

भारतीय कंपनी हिकल राफेल विमानाच्या कंट्रोल सिस्टीमसाठी बनवणार महत्त्वाचे घटक

डसॉल्ट एव्हिएशनकडून महत्त्वाची जबाबदारी

बंगळूरूस्थित भारतीय एरोस्पेस कंपनी हिकल टेक्नोलॉजी (Hical Technologies) सोबत फ्रान्सची अग्रगण्य विमान निर्माता कंपनी डसॉल्ट एविएशनने महत्त्वपूर्ण करार केला आहे. या करारानुसार हिकल टेक्नॉलॉजीज आता राफेल या लढाऊ विमानाच्या फ्लाइट कंट्रोल सिस्टीमसाठी महत्त्वाचे घटक तयार करणार आहे. भारतीय एरोस्पेस उत्पादन क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

डसॉल्ट राफेल हे जगातील सर्वात आधुनिक मल्टीरोल लढाऊ विमानांपैकी एक मानले जाते. याचे दोन आसनी मॉडेल डसॉल्ट राफेल B हवाई वर्चस्व, जमिनीवरील हल्ले तसेच गुप्तचर मोहिमा अशा विविध प्रकारच्या मिशनसाठी सक्षम आहे. या विमानाच्या कार्यक्षमतेत अत्याधुनिक फ्लाइट कंट्रोल सिस्टीमची महत्त्वाची भूमिका असते. ही प्रणाली कठीण परिस्थितीत आणि प्रचंड ताणाखालीही अचूक कामगिरी सुनिश्चित करते. या करारानुसार हिकल टेक्नॉलॉजीज या प्रणालीशी संबंधित महत्त्वाच्या घटकांचे उत्पादन करेल, जे डसॉल्ट एव्हिएशनच्या कठोर अभियांत्रिकी आणि गुणवत्ता मानकांनुसार तयार केले जातील.

डसॉल्ट एव्हिएशनचे खरेदी आणि पुरवठा विभागाचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष ब्रुनो कॉईफिर यांनी या भागीदारीचे कौतुक करत म्हटले, “हिकल टेक्नॉलॉजीजने गुणवत्ता आणि विश्वासार्हतेबाबत मजबूत बांधिलकी दाखवली आहे- ही मूल्ये डसॉल्ट एव्हिएशनच्या उत्कृष्ट परंपरेशी पूर्णपणे जुळणारी आहेत.”

हिकल टेक्नॉलॉजीजचे व्यवस्थापकीय संचालक यशज जयवीर यांनी या कराराला कंपनीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, “हा करार अभियांत्रिकी क्षेत्रात वर्षानुवर्षे केलेल्या गुंतवणुकीचे फलित आहे. जगातील सर्वात प्रगत लढाऊ विमानांपैकी एक असलेल्या राफेलसाठी आवश्यक घटक तयार करण्याची जबाबदारी मिळणे म्हणजे भारतीय एरोस्पेस उत्पादन क्षेत्र जागतिक स्तरावर पोहोचल्याची मोठी ओळख आहे.” हा करार भारताच्या मेक इन इंडिया उपक्रमासाठीही महत्त्वाचा मानला जात आहे.

हेही वाचा :

बहरीनमध्ये पाच पाकिस्तानींसह बांगलादेशीला अटक!

“आदित्य ठाकरेंचे अर्थसंकल्पावरील आरोप म्हणजे मनी वसे ते सर्वत्र दिसे!”

‘आयुष्यातील सर्वात मोठी चूक’ म्हणत सायली सुर्वेने स्वीकारला हिंदू धर्म

अमेरिकेच्या फेडरल सरकारी नेटवर्कमधून ‘क्लॉड एआय’ हटवणार?

भारत सध्या जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्र आयातदार असून २०२१ ते २०२५ या कालावधीत जागतिक शस्त्र आयातीमध्ये त्याचा वाटा सुमारे ८.२ टक्के राहिला आहे. त्यामुळे संरक्षण उपकरणांच्या निर्मितीत देशांतर्गत उद्योगांचा सहभाग वाढवणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट आहे. हिकल टेक्नॉलॉजीज यापूर्वीही उपग्रह, क्षेपणास्त्र आणि एव्हियोनिक्सशी संबंधित घटकांचा पुरवठा करत आली आहे. बेंगळुरूमधील कंपनीच्या आधुनिक उत्पादन सुविधा, स्वयंचलित असेंब्ली आणि कठोर चाचणी प्रक्रिया यामुळे उच्च विश्वासार्हतेची संरक्षण उत्पादने तयार करणे शक्य झाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version