घरविशेषकारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!

कारसेवक देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत घेतले रामललांचे दर्शन!

वाराणसीत काशी विश्वनाथाचे दर्शन

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात तिन्ही कारसेवांमध्ये सहभाग नोंदविणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज(३० मे) अयोध्येत प्रश्रूश्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. तत्पूर्वी आज सकाळी त्यांनी काशीत काशी विश्वनाथाचे दर्शनही घेतले.

अयोध्येत रामललांचे दर्शन घेतल्यानंतर श्री रामजन्मभूमी न्यासाच्या पुस्तिकेत देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या संदेश पुस्तिकेत त्यांनी लिहिले की, “ज्या रामाच्या मंदिर पुननिर्माणात कारसेवक म्हणून सेवा देण्याची संधी मला मिळाली, त्याच मंदिराचे पुननिर्माण झाल्यानंतर प्रत्यक्ष रामललांचे दर्शन घेण्याची संधी सुद्धा मला मिळाली, हे माझे परमभाग्य आहे. मी रामललांचे खूप खूप आभार मानतो. राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या या यज्ञात आहुती देणार्‍या सर्वांना मी नमन करतो. विशेषत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, या न्यासाचे सर्व विश्वस्त आणि मंदिर निर्माणातील विश्वकर्मांच्या दुतांना मी प्रणाम करतो. जय श्रीराम.”

हेही वाचा..

“केजरीवालांची प्रकृती खराब आहे तर ते निवडणुकीचा प्रचार का करतायत?”

ज्यूंना संपवणार म्हणत पाकिस्तानी कारचालकाने ज्यू विद्यार्थ्यावर घातली गाडी

ड्रायव्हर बनला सीबीआय अधिकारी, केली फसवणूक!

मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी केलेला विवाह मुस्लीम कायद्यानुसार वैध नाही

अयोध्येतील राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर बाहेर त्यांनी बांधकाम कामगारांसोबत छायाचित्र सुद्धा काढून घेतले आणि महाराष्ट्रातून दर्शनासाठी आलेल्या बंधू, भगिनींच्या भेटीसुद्धा घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांना पाहताच या मराठी बांधवांनी ‘४०० पार-मोदी सरकार’ असे नारे दिले. देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येत हनुमान गढी मंदिरात सुद्धा दर्शन घेतले.

राममंदिरात दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राममंदिर नव्याने उभारल्यानंतर दर्शनाची प्रचंड ओढ होती. ३ वेळा कारसेवक आणि अनेकदा रामसेवक म्हणून अयोध्येत आलो. पण, आज रामाचे दर्शन घेतल्यानंतर माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. देवाला काहीच मागायचे नसते, त्याला सारे काही ठावूक असते. आपल्या हयातीत राममंदिर होईल, हे ठावूक नव्हते. पण, मोदीजींचे आभार की हे मंदिरही झाले आणि त्याचे दर्शन घेण्याची संधीही मला मिळाली. आम्ही निवडणुकीपुरते हिंदू नाहीत. आम्ही रामसेवक आहोत आणि रामाला मानतो सुद्धा, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version