घरविशेषपोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट!

पोस्टे कटेझरी हद्दीतील माओवादी स्मारक गडचिरोली पोलीसांनी केले नष्ट!

गडचिरोली पोलीसांनी माहिती 

दोन ते तीन वर्ष जुने मौजा कटेझरी व मर्मा जंगल परिसरात माओवाद्यांनी उभारलेलेे दोन स्मारक सुरक्षा दलातील जवानांनी केले नष्ट केले, अशी माहिती गडचिरोली पोलीसांनी एक्सवर पोस्टकरत दिली. या स्मारकाच्या ठिकाणी वृक्षारोपण करीत पोलीस दलाने शांतता व सुरक्षेचा संदेशही दिला. कारवाई करतानाचे फोटोही पोलिसांनी पोस्ट केले आहेत.

यासह भामरागड तालुक्यातील पोस्टे कोठी हद्दीतील मौजा मरकणार येथील ग्रामस्थांनी माओवाद्यांना गावबंदी केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. गडचिरोली पोलिसांनी म्हटले, ग्रामस्थांनी ०१ भरमार बंदूक पोलिसांकडे सुपूर्द केली. जानेवारी २०२४ पासून अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील एकूण ४० गावांनी माओवादींच्या विरोधात ‘गावबंदी’ जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच पोलिसांनी रेकी करणाऱ्या एका नक्षल समर्थकास अटकही केली. गडचिरोली पोलिसांनी एक्सवर पोस्टकरत म्हटले, भामरागड परिसरात घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने रेकी करणा­या नक्षल समर्थकास गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफने अटक केली. ३० सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version