घरविशेषभांडूपमध्ये बसचा भीषण अपघात

भांडूपमध्ये बसचा भीषण अपघात

भांडुप गाढव नाका परिसरामध्ये बेस्ट चालकाचा बसवरील नियंत्रण सुटून अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. ६०५ क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती.

भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसणे रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली यामध्ये ८२ वर्षाचे कुंडलिक भगत यांचा जागीच मृत्यू झाला. तर ६५ वर्षीय रवींद्र तिवारी हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भांडुप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलीस करत आहेत.

हे ही वाचा:

लोकसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित

छडी लागे छम् छम् विद्या येई घम् घम्, अशी ठाकरे सरकारची चंपी

गेले देशमुख कुणीकडे?

आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो?

६०५ क्रमांकाची ही बस भांडुप रेल्वे स्थानकावरून टेंभीपाडा परिसराकडे जात होती. भांडुपचा गाढव नाका परिसरामध्ये भरधाव वेगात असताना बेस्ट चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि या बेस्ट बसने रस्त्यावरून जात असलेल्या दोन नागरिकांना धडक दिली. या घटनेनंतर भांडूप पोलिसांनी बेस्ट चालकाला ताब्यात घेतले असून मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास भांडुप पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version