घरविशेषमेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!

मेरठच्या तुरुंगात कैद रवी अत्री नीट पेपरफुटीचा सूत्रधार असण्याची शक्यता!

या प्रकरणी तपास संस्थांकडून तपास सुरू

मेरठ तुरुंगात कैद असलेला रवी अत्री हाच नीट पेपरफुटीप्रकरणामागचा सूत्रधार असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्याने तुरुंगात राहूनच नीट पेपरफुटीचा कट तडीस नेला, असे सांगितले जात आहे. सध्या या प्रकरणी तपास संस्थांकडून तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलिस तपास करतील.

रवी अत्री हा सन २०१२चे नीट पेपर आणि उत्तर प्रदेश कॉन्स्टेबल भर्तीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपाखाली तुरुंगात कैद आहेत. रवी अत्री हा पेपरफुटीप्रकरणी मोठा सूत्रधार मानला जात आहे. त्यामुळेच नीट पेपरफुटीप्रकरणी त्याचाही हात असेल, असे मानले जात आहे.

हे ही वाचा:

मान्सून जुलैपर्यंत वायव्य भारत व्यापेल!

वाढवण, ग्रेट निकोबारच्याविरोधाचा बोलवता धनी कोण? कोणते हिंदी आहेत, चीनचे भाई भाई

दहशतीचे लोण पश्चिम बंगालच्या राजभवनपर्यंत!

हाके गोधडीत शिरल्यामुळे जरांगेंची चरफड…

अत्री हा सन २००७मध्ये राजस्थानमधील कोटा येथे परीक्षेची तयारी करण्यासाठी गेला होता. तेव्हा तिथे त्याची मैत्री कॉपी करणाऱ्या टोळीशी झाली. त्याने या कॉपीबहाद्दर टोळीसोबत सन २०१२चा पेपर फोडला होता. या दरम्यान त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती.

या कॉपीबहाद्दूर टोळीने सुमारे १०० कोटींहून अधिक पैशांचा गैरव्यवहार केला आहे.
या टोळीने आतापर्यंत नीट, एसबीआय असिस्टंट, आरो, एआरओ, यूपी पोलिस भर्ती यांसह आठ परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फोडल्या आहेत. या टोळ्यांचे धागेदोरे दिल्लीपासून ते बिहार, हरियाणा राजस्थान, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांशी जोडले आहेत. तपास संस्था या सर्व राज्यांमध्ये तपास करत आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version