घरविशेष“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”

“मोदी-ट्रम्प यांची चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का?”

राहुल गांधींच्या वक्तव्यावर दिलीप घोष यांचा प्रतिप्रश्न

काँग्रेस खासदार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून भाजप नेते दिलीप घोष यांनी जोरदार प्रतिक्रीया दिली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेवर प्रश्न उपस्थित केला होता. यावर दिलीप घोष यांनी राहुल गांधींवर थेट टीका केली आहे.

भाजपा नेते दिलीप घोष म्हणाले, “मोदी आणि ट्रम्प यांच्यातली चर्चा राहुल गांधींच्या समोर झाली होती का? त्यांनी कुठल्या आधारावर हे विधान केलं? हे खोटं फार काळ टिकणार नाही. ते पुढे म्हणाले, “जनतेला दिसत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करत आहेत आणि आज पाकिस्तानची अवस्था काय आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या असत्य वक्तव्यांना कोणीही गांभीर्याने घेणार नाही.”

खरे तर, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा हवाला देत राहुल गांधी यांनी दावा केला की ट्रम्प यांच्या आवाहनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच तासांत ‘ ऑपरेशन सिंदूर ‘ अंतर्गत पाकिस्तानमध्ये सुरू असलेली लष्करी कारवाई थांबवली. बुधवारी (२७ ऑगस्ट) बिहारमधील मुझफ्फरपूर येथे ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला.

हे ही वाचा : 

विरार दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

राहुल गांधी यांच्या यात्रेत भाषा घसरतेय

पोलिस एसआय भरती परीक्षा रद्द

मध्य प्रदेशात ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्यावर सर्व पक्ष एकमत

‘ट्रम्प यांनी म्हटले आहे की जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू होते, तेव्हा मी नरेंद्र मोदींना फोन करून सांगितले की ते जे करत आहेत ते २४ तासांच्या आत थांबवा. नरेंद्र मोदींनी संपूर्ण ऑपरेशन (लष्करी ऑपरेशन) २४ तासांत नाही तर फक्त पाच तासांत थांबवले,’ असे राहुल गांधी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version