घरविशेषजय श्रीराम : सोहळ्यातील ११ हजार व्हीआयपींना देणार स्मृतिचिन्ह!

जय श्रीराम : सोहळ्यातील ११ हजार व्हीआयपींना देणार स्मृतिचिन्ह!

सनातन सेवा न्यास संस्थेचा संकल्प

अयोध्येतील राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाला काही दिवस बाकी असताना आता तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. राम लल्लाच्या ‘प्राण-प्रतिष्ठा’ सोहळ्याचा वैदिक विधी सोहळा १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट देखील कार्यक्रमाच्या तयारीची माहिती घेत आहे.मर्यादित निमंत्रितांसह , राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत इतर नेत्यांसह होणार आहे.या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो संतांना निमंत्रित करण्यात आले असून निमंत्रितांमध्ये अयोध्येत राममंदिर उभारणाऱ्या मजुरांच्या कुटुंबांचाही समावेश आहे.या कालावधीत ११,००० हून अधिक पाहुणे आणि निमंत्रितांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.

२२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.या सोहळ्याला देशभरातील नामांकित, प्रतिष्ठित व्हीआयपी लोकांना निमंत्रण देण्यात आले आहे.दरम्यान, सोहळ्या सुरु होण्यापूर्वीच अयोध्येत भाविकांची येजा- सुरु आहे.हजारोंच्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होत आहेत.या सोहळ्यानिमित्त १२ जानेवारीपासून अयोध्येत येणार्‍या भाविकांना ‘सनातन सेवा न्यास’ संस्थेकडून परभू राम यांच्याशी संबंधित स्मरणार्थ चिन्ह दिले जाणार आहे.

हे ही वाचा:

ईडी अधिकाऱ्यांवरील हल्ल्याच्या पाच दिवसांनंतरही शाहजहां यांचा ठावठिकाणा नाही!

राम मंदिराचे आमंत्रण धुडकावल्याने काँग्रेसमध्येच नाराजी!

केरळच्या प्राध्यापकाचा हात कापणारा पीएफआयचा सदस्य १२ वर्षांनी जेरबंद!

१२ जानेवारीला पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबईतील प्रकल्पांचे उदघाटन!

सनातन सेवा न्यासचे संस्थापक यांचे शिष्य शिवोम मिश्रा यांनी ही माहिती दिली.ते म्हणाले की, प्रभू रामाशी संबंधित असणारे चिन्ह पाहुण्यांना भेट म्हणून दिले जाणार आहे.भेटवस्तू मध्ये प्रभू रामांचा प्रसाद आणि एक चिन्ह असणार आहे. मिश्रा यांनी स्पष्ट केले की, पाहुण्यांसाठी देण्यात येणाऱ्या भेटवस्तूमध्ये दोन बॉक्स असणार आहेत.ज्यामध्ये एका बॉक्सयामध्ये प्रसाद म्हणून गाईच्या दुधापासून मिळणाऱ्या तुपापासून बनवलेला बेसन लाडू आणि रामानंदी परंपरेनुसार पवित्र तुळशीचे पान असेल. तर दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू रामाशी संबंधित वस्तूंचा समावेश असेल, जसे की मंदिराच्या पायाभरणी समारंभात मंदिराच्या गर्भगृहातून निघालेली माती, अयोध्येची माती आणि सरयू नदीचे पाणी, स्मृतिचिन्ह.याशिवाय, राम मंदिराशी संबंधित एक पितळी प्लेट आणि चांदीचे नाणे हे असणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version