घरविशेषरस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली पिक-अप, ८ ठार

रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली पिक-अप, ८ ठार

८ जणांचा मृत्यू, तर सहा जणांना वाचवण्यात यश

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या दुर्दैवी दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून ६ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून सर्व मृत व्यक्ती हे पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याचे समजते.

माहितीनुसार, म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी आलेले भाविक धार्मिक कार्यक्रम आटोपून परतत असताना हा अपघात झाला. पिकअप वाहनातून सर्वजण प्रवास करत होते. वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत कोसळली. अपघात इतका अचानक झाला की वाहनातील अनेकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत पडलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. यानंतर शर्थीच्या प्रयत्नांनंतर विहिरीत अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याचे झाला, तर ६ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले.
हे ही वाचा:
अडखळलेला मान्सून पुन्हा घेणार वेग

‘हेल्दी’ आणि ‘ऑर्गॅनिक’च्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल

देरहादूनमधील भाजपा कार्यकर्त्याच्या हत्येनंतर आरोपीचे घर जाळले, बुलडोझरची कारवाई

ओमान किनाऱ्याजवळ ‘विराट १’ जहाजाच्या इंजिनात बिघाड

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये महिला आणि पुरुष भाविकांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी रुग्णालय आणि घटनास्थळी गर्दी केली. त्यांच्या आक्रोशाने परिसरातील वातावरण शोकमय झाले. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. वाहनाचा वेग, चालकाचे नियंत्रण सुटण्यामागील कारणे आणि रस्त्यावरील परिस्थिती यांचा तपास केला जात आहे. ८ जणांचे प्राण घेणाऱ्या या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षा आणि प्रवासी सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version