घरविशेषप्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम संपन्न

भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे झाली. राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव सुनिल सोनार यांनी ध्वजवंदन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता उपस्थित होते. शासनाच्या राजशिष्टाचार विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात भारतीय नौदल, गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल, मुंबई लोहमार्ग पोलीस दल, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याचे सी-६० पथक, गृह रक्षक दल (पुरुष), बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, गृहरक्षक दल (महिला), राज्य उत्पादन शुल्क विभाग, वन विभाग, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ बृहन्मुंबई व ठाणे जिल्हा, नागरी संरक्षण दल (पुरुष/ महिला), राष्ट्रीय सेवा योजना (मुले/मुली) एम.सी.एम गर्ल्स हायस्कूल काळाचौकी, सी. कॅडेट कोअर (मुली), सी. कॅडेट कोअर (मुले), रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) डॉ.अँटोनिओ डिसिल्वा हायस्कूल दादर, मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) अंजुमान ए इस्माईल हायस्कूल, बांद्रा मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुले) रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल, दहिसर मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल (मुली) मनपा शाळा पंतनगर, घाटकोपर (पूर्व) मुंबई, रोड सेफ्टी पॅट्रोल मनपा माणिकलाल एम. पी. एस इंग्लिश हायस्कूल, घाटकोपर मुंबई. स्टुडन्ट पोलीस कॅडेट (मुल-मुली) बृहन्मुंबई महानगरपालिका, ब्रास बँड पथक, पाईप बँड पथक आदी पथकांनी सलामी दिली. कमांडर सुमितसिंग चौहान हे संचलन प्रमुख होते.

हेही वाचा..

विरोधी पक्षातील १० खासदारांचे निलंबन

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आयएएस अधिकारी पूजा सिंघलना सोरेन सरकारने घेतले नोकरीत

घुसखोरांना आसरा देणाऱ्यांना आसरा मिळणार नाही!

महाराष्ट्रात दोन लाख बांगलादेशी-रोहिंग्यांनी जन्म प्रमाणपत्रांसाठी केले अर्ज!

महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिन संचलनातील सर्वोत्कृष्ट संचलन पथकांना अप्पर पोलीस महासंचालक (प्रशासन) डॉ. निखिल गुप्ता यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक राज्य राखीव दल, द्वितीय क्रमांक बृहन्मुंबई सशस्त्र दल (पुरुष) तर तृतीय क्रमांक बृहन्मुंबई नियंत्रण पथकास देण्यात आला. यावेळी विविध विभागांच्या चित्ररथांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी आणि नरेंद्र बेडेकर यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version