घरविशेषसरसंघचालक मोहनराव भागवतांचे आज मुंबईत व्याख्यान

सरसंघचालक मोहनराव भागवतांचे आज मुंबईत व्याख्यान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त खास कार्यक्रम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त मुंबईत एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी सरसंघचालक मोहनराव भागवत मुंबईत उपस्थित राहणार आहेत. वरळीतील नेहरू सेंटर ऑडिटोरियममध्ये त्यांची दोन व्याख्याने होणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ :  १०० वर्ष की संघ यात्रा – नए क्षितिज  या विषयावर हे व्याख्यान आहे. शनिवारी संध्याकाळी ४ वाजता आणि संध्याकाळी ६.१५ वाजता अशा दोन सत्रात ही व्याख्याने होणार आहेत.

ही व्याख्याने थेट ऐकण्याची व्यवस्थाही करण्यात आली असून डिजिटल माध्यमातूनही ही व्याख्याने ऐकता येतील.

हे ही वाचा:

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर गुगलची ऐतिहासिक झेप

‘वैभव’शाली विजय; युवा भारताने वर्ल्डकप जिंकला

जीवलग मित्र गमावला, वाढदिवस साजरा करणार नाही!

सोने–चांदी महागाईच्या केंद्रस्थानी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ मध्ये केली. त्यानंतर गेली १०० वर्षे अथक आणि अत्यंत संघर्षमय प्रवास करून संघटनेचा विस्तार देशविदेशातही झाला. देशाच्या वाटचालीत संघाचे महत्त्वाचे योगदान या १०० वर्षांच्या प्रवासात लाभले आहे. आज कोट्यवधी स्वयंसेवकांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य जगभरात सुरू आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version