घरविशेषश्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब बिष्णोईच्या हिटलिस्टवर!

श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताब बिष्णोईच्या हिटलिस्टवर!

बाबा सिद्दिकी हत्येच्या तपासादरम्यान खुलासा

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी आफताब पूनावाला हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समोर येताच दिल्ली पोलीस सतर्क झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येच्या तपासादरम्यान हा खुलासा झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपी आफताब पूनावाला हा लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर असल्याचे तपासात आले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अटकेतील आरोपी शिवकुमार गौतम उर्फ ​​शिवा याने तपासात सांगितले की शुभम लोणकर याने आफताब पूनावालावर हल्ला करण्याबाबत चर्चा केली होती. मात्र, पूनावाला याच्या कडेकोट बंदोबस्तामुळे टोळीने तसे करणे टाळले. दरम्यान, आरोपी आफताफ पूनावाला सध्या तिहार तुरुंगात आहे. या माहितीनंतर आरोपी भवती पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.

मे २०२२ मध्ये श्रद्धा वालकर या २७ वर्षीय महिलेच्या तिच्या लिव्ह-इन-पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिचा गळा दाबून खून केला होता, त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. श्रद्धाने लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर आरोपीने हा गुन्हा केल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : 

शिवाजी महाराजांचे मंदिर नको, आधी गडकिल्ल्यांचे संवर्धन करा!

“कोमट” पाण्यातील गॅरंटीच्या “चकल्या”

काँग्रेस, कन्हैय्या कुमार सारख्या नेत्यांची महिलांबाबतची मानसिकता समोर येते!

‘बटेंगे तो कटेंगे’ हा देशाचा इतिहास!

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version