घरविशेषरस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!

रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!

कोल्हापूरमधील घटनेची चर्चा

डॉक्टरांनी रुग्णाला मृत घोषित करावे आणि काही वेळात तो रुग्ण खडखडीत बरा होऊन घरी परतावा, अशी अद्भूत घटना कोल्हापुरात घडली. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर वृद्ध पांडुरंग उलपे यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. मात्र, घरी घेवून जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे मृत घोषित केलेले उलपे पुन्हा जिवंत झाले.

रस्त्यांवरील जीवघेणे खड्डे हे कोल्हापुरातील एका आजोबांसाठी वरदान ठरले आहेत. १५ दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना पांडुरंग उलपे यांना हृदयविकाराचा झटका आला होता. घामाघूम होवून रस्त्यावर पडलेल्या पांडुरंग उलपे यांना पत्नीने रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तपासणी करून पांडुरंग उलपे यांची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले. पांडुरंग उलपे यांची प्राणज्योत मालवल्याची बातमी कोल्हापूरच्या कसबा-बावडा परिसरात वाऱ्यासारखी पसरली.

हे ही वाचा : 

अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम

मदरशाच्या नावाखाली मुबारक अलीकडून खोट्या नोटा छापण्याचे काम!

मनू भाकर, गुकेश, हरमनप्रीत आणि प्रवीण कुमारला खेलरत्न!

‘मास्तरांची सावली’ साहित्य पुरस्कार जाहीर

यानंतर जवळचे पाहुणे, नातेवाईक, गावकरी त्यांच्या घरी जमले आणि सर्वांनी पांडुरंग उलपे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरु केली. पण घडले वेगळेच. दु:खद घटना अचानक सुखद घटनेत रूपांतरित झाली. रुग्णालयातून उलपे यांना घरी घेवून जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला आणि त्याच वेळी पांडुरंग उलपे यांच्या शरीराची हालचाल सुरु झाली.

तेव्हा त्यांना नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर उपचार घेवून पांडुरंग उलपे हे चक्क आपल्या पायाने घरी चालत आले. हा चमत्कार पांडुरंगाच्या कृपेमुळेच झाले असल्याचे पांडुरंग उलपे यांच्या कुटुंबाचे म्हणणे आहे. दरम्यान, ही चमत्काराची घटना कोल्हापुरात चर्चेचा विषय बनली आहे.

 

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version