घरविशेषभारताच्या 'या' खेळाडूला कोरोनाची लागण

भारताच्या ‘या’ खेळाडूला कोरोनाची लागण

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियावर सध्या कोरोनाचं सावट असलेलं पाहायला मिळत आहे. कसोटी मालिकेपूर्वी करण्यात आलेल्या कोरोना चाचणीत एका भारतीय खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारताचा तडाखेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक रिषभ पंत आहे. अशातच खेळाडूला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तसेच खेळाडूच्या संपर्कात आल्यामुळे इतर खेळाडूंनाही क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे.

रिषभ पंतचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो सध्या होम विलगीकरण आहे. पंत काही दिवसांनी डरहम कॅम्पसोबत जोडला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतच्या घशात गेल्या काही दिवसांपासून वेदना होत होत्या. त्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर या खेळाडूचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूच्या संपर्कात आलेल्या खेळाडूंना तीन दिवसांसाठी विलगीकरणामध्ये ठेवण्यात येणार आहे. विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर हे खेळाडू संघातील इतर खेळाडूंसोबत जोडले जाणार आहेत. या संपूर्ण प्रकरणावर बीसीसीआयचं लक्ष असून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

हे ही वाचा:

सरकारचे बेकायदेशीर बांधकामांकडे दुर्लक्ष

इंधनाच्या किंमती कमी करण्यासाठी मोदी सरकारची महत्वाची पावले

‘हर घर जल’…२३ महिन्यांत ४.५ घरांना नळ जोडणी

आयुर्वेद, होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारचा मोठा निर्णय

ऋषभ पंतला कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्याच्याजागी संघात कोणाला स्थान मिळणार याबाबत संघ व्यवस्थापन अभ्यास करत आहे. दौऱ्यावर गेलेल्या खेळाडूंमध्ये वृद्धीमन साहा आणि लोकेश राहुल हे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज असल्याने पंतच्या जागी या दोघांतील एकाला संघात स्थान मिळण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version