घरविशेष'रॉ' एजंटच्या भूमिकेत दिसणार 'खिलाडी' कुमार! बघा 'बेलबॉटम' चा धमाकेदार ट्रेलर

‘रॉ’ एजंटच्या भूमिकेत दिसणार ‘खिलाडी’ कुमार! बघा ‘बेलबॉटम’ चा धमाकेदार ट्रेलर

अक्षय कुमारच्या बहुचर्चित अशा ‘बेलबॉटम’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ३ मिनिटे २९ सेकंदांच्या या ट्रेलरला प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळताना दिसत आहे. अवघ्या काही तासांतच कोट्यावधी लोकांनी हा ट्रेलर बघितला आहे. त्यामुळे ‘खिलाडी कुमारचा’ हा आगामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर नेमका काय धमाका करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हा चित्रपट काही सत्य घटनांवर आधारित असून यात १९८४ साली झालेल्या एका विमान हायजॅकवर ही कथा आहे. भारताचे आतंकवाद्यांकडून हायजॅक करण्यात आलेले विमान आणि ओलीस ठेवलेले नागरिक वाचवण्यासाठी पुढे सरसावलेला एक ‘रॉ’ चा गुप्तहेर यावर ही कथा बेतलेली आहे. ही कथा भारताच्या पहिल्या गुप्त ऑपरेशनची असल्याचे सांगितले जात आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या अपप्रचाराला राज्यपालांची टाचणी

…म्हणून काँग्रेस नेत्याला केले समर्थकांनीच ट्रोल

भारतातील कम्युनिस्ट पक्षांआडून चीन खेळत होता डावपेच

अहिंसेच्या विचारांना काँग्रेसनेच दिली मूठमाती; उपसभापतीला मारहाण

या चित्रपटात अक्षय कुमार एका ‘राॅ’ एजंटची भूमिका साकारत असून त्याच्या जोडीला वाणी कपूर, हुमा कुरेशी अशी तगडी स्टारकास्ट आहे. तर रंजीत तिवारी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वासू भगनानी, जॅकी भगनानी, दीपशिखा देशमुख, मोनिषा अडवाणी आणि निखिल अडवाणी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. १९ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version