घरविशेषराज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

गृह विभागाने काढले आदेश

राज्यातील १० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी गृह विभागाकडून काढण्यात आले आहे. अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह व सुधार सेवा) अमिताभ गुप्ता यांची यांची बदली अप्पर पोलोस महासंचालक विशेष कृती येथे करण्यात आली असून कारागृह व सुधारसेवा हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे.

पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची नियोजन व समन्वय महाराष्ट्र राज्य येथे बदली करण्यात आली आहे. विशेष कृती दलाचे अप्पर पोलीस महासंचालक प्रवीण साळुंखे यांची अप्पर पोलीस महासंचालक लोहमार्ग येथे बदली करण्यात आली आहे. महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक दीपक पांडे यांची पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक म्हणून बदली करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

शरद पवार म्हणतात, शेतकऱ्यांना वीज मोफत कशाला?

‘काश्मीर टायगर्सने’ घेतली कठुआ दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी !

भुलवून रशियन सैन्यात भरती केलेल्या भारतीयांची होणार सुटका

कठुआमधील हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून; स्थानिकांनी मदत केल्याची माहिती

सुरेश मेखला वाहतुक महाराष्ट्र राज्य, विशेष पोलीस महासंचालक सुहास वारके यांची महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महासंचालक पदी बदली करण्यात आली आहे. अस्विनी डोरजे, छेरिंग डोरजे , रंजन कुमार शर्मा, डी.के.पाटील भुजबळ यांची विशेष पोलीस महासंचालक म्हणून रिक्त जागेवर बदली करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version