घरविशेषतृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी

तृणमूल काँग्रेस ‘फ्युचर गेमिंग’चा सर्वात मोठा लाभार्थी; ५४० कोटींची देणगी

द्रमुकला ५०९ कोटींची देणगी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) निवडणूक रोख्यांची माहिती जाहीर केली. निवडणूक आयोगाने गुरुवारी निवडणूक रोख्यासंदर्भातील माहिती समोर आणली. अशातच नाव समोर आले ते सांतियागो मार्टिनच्या ‘फ्युचर गेमिंग’चे या कंपनीने देशभरातील बहुतेक राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आहेत. तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकसाठी एक रकमी ५०९ कोटी रुपये देणारी ‘फ्युचर गेमिंग ऍन्ड हॉटेल सर्व्हिसेस’ कंपनीबद्दल नवी माहिती समोर आली आहे.

‘फ्युचर गेमिंग ऍन्ड हॉटेल सर्व्हिसेस’ या कंपनीने ५४० कोटी रुपयांची देणगी तृणमूल काँग्रेसला दिली आहे आहे. तृणमूल काँग्रेस हा ‘फ्युचर गेमिंग ऍन्ड हॉटेल सर्व्हिसेस’चा सर्वात मोठा लाभार्थी आहे. भाजपा, काँग्रेस, द्रमुक, वायएसआर काँग्रेस या पक्षांनाही राजकीय देणग्या देण्यात आल्या आहेत.

राजकीय पक्षांना मिळालेल्या निवडणूक रोख्यांचे विशिष्ट क्रमांक जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला दिले होते. त्यानुसार स्टेट बँकेने निवडणूक रोख्यांचा तपशील आणि विशिष्ट क्रमांक यांची माहिती निवडणूक आयोगाला दिली. त्यानंतर आयोगाने गुरुवारी ती माहिती त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली.

हे ही वाचा:

आपचे नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक

मोदींची तुलना औरंगजेबाशी हा तर देशद्रोह!

‘विकसित भारत’चे मेसेज शेअर करू नका!

राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत

राजकीय पक्षांना सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘फ्युचर गेमिंग’ने १,३६८ कोटी रुपयांचे रोखे खरेदी केले. या कंपनीने द्रमुकला ५०९ कोटी, वायएसआर काँग्रेसला १६० कोटी, भाजपला १०० कोटी आणि काँग्रेसला ५० कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या आहेत. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंट या सिक्कीममधील राजकीय पक्षांना १० कोटींपेक्षा कमी रक्कम मिळाली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version