घरविशेषउज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाणार

उज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाणार

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव

दोन वर्षांतून एकदा होणाऱ्या सिंहस्थापूर्वी हरिद्वारसारखे कायमस्वरूपी आश्रम बांधून उज्जैनला पवित्र शहर म्हणून विकसित केले जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे. पुढील सिंहस्थ २०२८ मध्ये आयोजित केला जाणार आहे.

यादव यांच्या कार्यालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उज्जैनला हरिद्वारसारखे धार्मिक शहर म्हणून विकसित करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हरिद्वारच्या धर्तीवर ऋषी, संत, महंत, आखाडा प्रमुख, महामंडलेश्वर इत्यादींना सिंहस्थापूर्वी उज्जैनमध्ये कायमस्वरूपी आश्रम बांधण्याची परवानगी दिली जाईल. साधू-संतांना कथा, भागवत आयोजित करण्यासाठी उज्जैनमध्ये राहण्यासाठी पुरेशी जमीन/प्लॉट आवश्यक आहे.

हेही वाचा..

आरजी कार पीडीतेच्या वडिलांनी मागितली अमित शहांकडे वेळ

हिंदूविरोधी राजकीय हिंसाचार करून बांगलादेशाने आपल्या पायावर धोंडा मारला!

वक्फ विधेयक बैठकीत टीएमसी खासदाराने बाटली फोडली

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी- बुच यांना हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमधून क्लीनचीट

त्यात उज्जैन विकास प्राधिकरण कायमस्वरूपी आश्रमांची योजना करेल. तात्पुरत्या बांधकामामुळे निर्माण होणारी समस्या टाळण्यासाठी सिंहस्थापूर्वी रस्ते आणि मूलभूत सुविधा वीज, पिण्याचे पाणी, ड्रेनेज इत्यादी पायाभूत सुविधा देण्याचे आश्वासन निवेदनात दिले आहे.

उज्जैनसह राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे यादव म्हणाले. आमच्या सर्व धार्मिक गुरूंना प्रार्थनास्थळ मिळावे हे आमचे प्राधान्य आहे, असे यादव यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version