घरविशेषमुंबईतील लसीकरणाला सुरूवात

मुंबईतील लसीकरणाला सुरूवात

मुंबईला तब्बल १ लाख लसींचा पुरवठा झाला असून पुन्हा एकदा ४५ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणास प्रारंभ झाला आहे. सध्या या लसी शासकीय लसीकरण केंद्रांवर उपलब्ध झाल्या आहेत.

मागचे काही दिवस मुंबईला लसींचा पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याचे म्हटले जात होते. मात्र रात्री उशिरा १ लाख डोसेस मुंबईत पोहोचले असून आजपासून ४५ वर्ष व त्यावरील वयागटाचे नियमित लसीकरण शासकीय व महापालिका लसीकरण केंद्रांवर सुरू झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर हँडल वरून देण्यात आली.

हे ही वाचा:

देशात ऑक्सिजन पुरवण्याचे हर तऱ्हेने प्रयत्न

बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण

बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा

पवारांना पुन्हा पंतप्रधान पदाचे वेध

भारतातील लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला आहे. यापूर्वी भारतातील लसीकरणाची मदार केवळ कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोनच लसींवर होती. मात्र भारतातील लसीकरणाचा वेग लक्षात घेऊन केंद्र सरकारने नव्या लसींची तरतूद केली आहे.

या नव्या लसींमध्ये परदेशी लसी आहेत. त्यापैकी स्पुतनिक ही लस भरतात दाखल झाली असून, लवकरच तिचेही डोस नागरिकांना दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर चार लसी देखील भारतात दाखल होणार आहेत. मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन, फायझर आणि कोवोवॅक्स या लसींना देखील भारताने मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतातील लसीकरण अधिक वेग पकडू शकेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version