घरविशेषसिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे 'झेब्रा क्रॉसिंग'

सिंह आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे ‘झेब्रा क्रॉसिंग’

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाच्या (राणीची बाग) नुतनीकरणाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पा अंतर्गत देश- विदेशातील विविध वन्यप्राणी राणीच्या बागेत आणण्यात येणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जुनागड आणि इंदोर येथील प्राणिसंग्रहालयातून सिंहाची प्रत्येकी एक जोडी राणीच्या बागेत आणण्याची योजना आहे.

सिंहाच्या जोडीचे दर्शन पर्यटकांना व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात एकामागून एक अडचणी येत आहेत. सिंह जोडीच्या बदल्यात देण्यासाठी झेब्र्याची जोडी मिळाल्यानंतर या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी पालिकेला अद्याप मिळालेली नाही. ही परवानगी मिळाल्यानंतरच मुंबईकरांना आणि इतर पर्यटकांना सिंहाचे दर्शन मिळणार आहे.

हे ही वाचा:

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांत मुंबईतला जान मोहम्मद

प्रसिद्ध चित्रकार देविदास पेशवे यांचे निधन

‘जेट’ पुढील वर्षी हवेत झेपावणार

ओबीसींची नाराजी नको म्हणून निवडणुका लांबणीवर?

या योजनेनुसार पालिकेने जुनागड आणि इंदोर येथील प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधून सिंह जोडी मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. सिंहाची जोडी मिळवण्यासाठी या दोन्ही प्राणिसंग्रहालयांना झेब्र्याची जोडी द्यावी लागणार आहे. राणीच्या बागेत झेब्रे नसल्यामुळे पालिकेला ते अन्य ठिकाणाहून मिळवून द्यावे लागणार आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने झेब्र्याच्या दोन जोड्या मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी देशातील, विदेशातील प्राणिसंग्रहालयांमध्ये यासाठी विचारणा करण्यात आली. या शोध मोहिमेत बराच वेळ गेला आणि इस्त्रायल येथे झेब्र्याच्या दोन जोड्या उपलब्ध असून त्या मिळवण्यासाठी पालिकेने आता प्रक्रिया सुरू केली आहे. झेब्र्याच्या दोन जोड्या देऊन पालिकेला सिंह मिळवता येतील, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या परवानगीसाठी वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानाच्या प्रशासनाने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला पाच महिन्यांपूर्वी पत्र पाठविले आहे. मात्र अद्याप त्याचे उत्तर आलेले नाही. प्राधिकरणाकडून परवानगी मिळताच इस्त्रायलवरून झेब्रा जोडी आणून ती जुनागड आणि इंदोर प्राणिसंग्रहालयाला देऊन सिंह जोडी आणण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version