घरविशेषरंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटीलचं काम!

रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असं विशाल पाटीलचं काम!

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटलांची टीका

भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल असे विशाल पाटील जिल्ह्यामध्ये काम करत असल्याचे संजयकाका पाटील यांनी म्हटले आहे. तर लोकसभेला पराभूत झाल्याने संजयकाका पाटील हे वैफल्यग्रस्त झाले असल्याचे खासदार विशाल पाटील म्हणाले आहेत.

भाजपचे संजयकाका पाटील म्हणाले, अपघाताने झालेला हा विशाल पाटील खासदार आहे. रंग बदलणाऱ्या सरड्यालाही लाज वाटेल, असा विशाल सरडा या जिल्ह्यामध्ये काम करतोय. एका स्टेजवर येवून जिल्ह्यातील, राज्यातील जनतेला कोणाच्या काळात किती पैसे आले आणि किती विकास झाला, हे जनतेला सांगण्याचे माझ्याकडून आवाहन आहे. तसेच बेताल वक्तव्य थांबवले नाहीत तर त्याचे राजकीय परिणाम भोगावे लागतील, असा इशारा संजयकाका पाटील यांनी विशाल पाटील यांना दिला आहे.

हे ही वाचा : 

काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदेंना सावरकरांविषयी उच्च कोटीचा आदर!

‘गांधीजींचे खरे अनुयायी असाल तर, काँग्रेस विसर्जित केली पाहिजे’

दिल्लीतील इस्रायल दूतावासाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात!

‘देशात ९० टक्के हिंदू राहतात, हिंदूंच्या हिताची काळजी घेणे गुन्हा नाही’

दरम्यान, संजय काकापाटील यांच्या टीकेवर खासदार विशाल पाटील यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, लोकसभेला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त संजयकाका झालेले आहेत. विधानसभेनंतर नगरपंचायतीच्या निवडणुकीत संजयकाका उभे राहतात की काय, अशी परिस्थिती झाल्याचे वाटत असल्याचे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपनगराध्यक्षाला मारहाण केल्याप्रकरणी संजयकाका पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून सांगलीमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version