घरबिजनेसभारतावर ॲमेझॉनचा ₹४.१ लाख कोटींचा विश्वास!

भारतावर ॲमेझॉनचा ₹४.१ लाख कोटींचा विश्वास!

AI, क्लाउड, डेटा सेंटर्स आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना

अमेरिकेतील ई-कॉमर्स आणि क्लाउड क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉनने भारतावर पुन्हा एकदा मोठा विश्वास व्यक्त करत २०३० पर्यंत देशात तब्बल ४८ अब्ज डॉलर्स (सुमारे ₹४.१ लाख कोटी) गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर ही महत्त्वाची घोषणा करण्यात आली. या नव्या योजनेअंतर्गत कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्लाउड कॉम्प्युटिंग, डेटा सेंटर्स, डिजिटल पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक्स आणि ई-कॉमर्स नेटवर्कच्या विस्तारावर मोठा भर देणार आहे.

या गुंतवणुकीत अतिरिक्त १३ अब्ज डॉलर्स विशेषतः AI आणि Amazon Web Services (AWS) च्या क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरच्या विस्तारासाठी खर्च केले जाणार आहेत. मुंबई आणि हैदराबादमधील डेटा सेंटर क्षमतेत मोठी वाढ करण्यात येणार असून, भारतीय स्टार्टअप्स, उद्योग आणि सरकारी संस्थांना अत्याधुनिक AI सेवा, सुरक्षित क्लाउड तंत्रज्ञान आणि उच्च क्षमतेची डिजिटल सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशी नागरिकांसाठी पुन्हा पर्यटन व्हिसा सेवा सुरू

ड्रग्ज, शस्त्रे, हवाला रॅकेट प्रकरणी अफगाण नागरिकासह सात जण अटकेत

सुरुवातीच्या दमदार खरेदीनंतर बाजाराने गमावली आघाडी

मुंबईत मुसळधार पाऊस, पण धरणे अजूनही रिकामी

पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीनंतर अँडी जॅसी यांनी भारताला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक संबोधत, भारतातील दीर्घकालीन भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, भारतातील स्टार्टअप्स, लघु-मध्यम उद्योग, निर्यात, रोजगारनिर्मिती आणि डिजिटल परिवर्तनाला गती देण्यासाठी ॲमेझॉन सातत्याने गुंतवणूक करत राहील. कंपनी भारतातील लाखो लघुउद्योजकांना जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचे काम अधिक वेगाने करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भारत हा ॲमेझॉनसाठी सर्वाधिक महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक बनला असून, कंपनीची ही नवी घोषणा देशातील AI, क्लाउड आणि डिजिटल पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणारी मानली जात आहे. या गुंतवणुकीमुळे हजारो नव्या रोजगार संधी निर्माण होण्याबरोबरच भारताला जागतिक AI आणि क्लाउड हब बनवण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version