घरबिजनेसचार सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार

चार सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार

भारताच्या चिप उत्पादन क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा जवळील जेवर परिसरात एचसीएल आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाऱ्या सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केली. हा प्रकल्प यमुना एक्सप्रेसवे औद्योगिक विकास प्राधिकरण क्षेत्रात उभारला जात असून, भारताच्या चिप उत्पादन क्षेत्रासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

या प्रकल्पासाठी सुमारे ३,७०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. येथे ओएसएटी (आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली अँड टेस्ट) प्रकारचे उत्पादन केले जाणार आहे. या युनिटमध्ये दरमहा सुमारे २० हजार वाफर्स प्रक्रिया करण्याची क्षमता असेल. येथे तयार होणाऱ्या चिप्सचा वापर मोबाईल फोन, लॅपटॉप, मोटारगाड्या, दूरदर्शन संच आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जाईल.
हे ही वाचा:
दहशतवादी मोड्युलचा पर्दाफाश, तामिळनाडू, प. बंगालमधून बांगलादेशी पकडले

पाश्चात्य जगात नव्या पिढीला नकोय कोणताही पंथ! भारतात मात्र आध्यात्माबद्दल डोळस विचार

भारत ब्राझिलमध्ये रेअर अर्थचा घसघशीत करार

पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यानंतर अफगाणिस्तानचा इशारा

पायाभरणी कार्यक्रमात बोलताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारत वेगाने सेमीकंडक्टर क्षेत्रात प्रगती करत आहे. देशात आतापर्यंत १० सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून, त्यापैकी चार युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार आहेत. यामुळे भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि देश आत्मनिर्भरतेकडे अधिक वेगाने वाटचाल करेल.

मोदी यांनी हे दशक तंत्रज्ञानाचे दशक असल्याचे नमूद केले. भारत सॉफ्टवेअर क्षेत्रात आघाडीवर आहे आणि आता हार्डवेअर तसेच चिप उत्पादनातही मोठी झेप घेत आहे. “मेक इन इंडिया” आणि “आत्मनिर्भर भारत” या संकल्पनांना बळ देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पामुळे सुमारे ३,५०० हून अधिक थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. स्थानिक उद्योग, पुरवठादार आणि लघुउद्योगांना याचा मोठा फायदा होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने या प्रकल्पासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की जेवर परिसर तंत्रज्ञान आणि औद्योगिक विकासाचे केंद्र बनत आहे. सेमीकंडक्टर प्रकल्पामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार असून, उत्तर प्रदेश देशाच्या औद्योगिक नकाशावर अधिक ठळकपणे पुढे येणार आहे.

एकूणच, एचसीएल–फॉक्सकॉनचा हा प्रकल्प भारताच्या सेमीकंडकक्टर मिशनसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. यामुळे भारताला जागतिक चिप उत्पादन क्षेत्रात मजबूत स्थान मिळविण्यास मदत होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version