घरबिजनेसभारताची निर्यात एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने

भारताची निर्यात एक ट्रिलियन डॉलरच्या दिशेने

पीयूष गोयल यांचा विश्वास

भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी मोठी संधी निर्माण झाली असून, आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये एक ट्रिलियन डॉलरच्या निर्यातीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य गाठण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी भारत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी योग्य मार्गावर असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जागतिक बाजारपेठेतील आव्हाने, आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चितता आणि बदलती व्यापारी धोरणे असतानाही भारतीय निर्यात क्षेत्राची कामगिरी आशादायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत भारताने वस्तू आणि सेवांच्या निर्यातीतून सुमारे ४८० अब्ज डॉलरचे उत्पन्न मिळवले आहे. त्यामुळे वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेल्या एक ट्रिलियन डॉलरच्या उद्दिष्टापैकी जवळपास ४८ टक्के लक्ष्य पहिल्या सहामाहीतच पूर्ण झाले आहे. दुसऱ्या सहामाहीत निर्यातीचा वेग आणखी वाढण्याची अपेक्षा असल्याने हे लक्ष्य गाठणे शक्य असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे. ऑक्टोबर महिन्यातील निर्यातीचे आकडेही सकारात्मक राहण्याची शक्यता असून, त्यांची अधिकृत घोषणा १३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हे ही वाचा:
शेअर बाजार आठ महिन्यांच्या उच्चांकावर

देशातील बेरोजगारीच्या दरात घट

महागड्या तिकिटांमुळे विमान प्रवासाकडे प्रवाशांनी फिरवली पाठ

पाकचा नन्ना मुन्ना, वय लपवून लावतोय चुना

भारताच्या निर्यातवाढीसाठी विविध देशांसोबत होणारे मुक्त व्यापार करार (FTA) महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. विशेषतः युरोपीय महासंघासोबतचा प्रस्तावित व्यापार करार भारतीय उत्पादकांसाठी जागतिक बाजारपेठेची नवी दारे उघडू शकतो. या करारांमुळे वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, पोलाद, रबर यांसह विविध क्षेत्रांतील उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. भारतीय कंपन्यांनी केवळ देशांतर्गत बाजारपेठेवर अवलंबून न राहता जागतिक मागणी लक्षात घेऊन उत्पादन क्षमता वाढवावी, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही गोयल यांनी केले.

भारतीय कंपन्यांसाठी जागतिक बाजारपेठेत विस्तार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगताना गोयल यांनी मारुती सुझुकीचे उदाहरण दिले. ही कंपनी जपानसह जगातील सुमारे ५० देशांमध्ये वाहनांची निर्यात करत आहे. भारताला जागतिक उत्पादन आणि निर्यात केंद्र बनवण्याची क्षमता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि देशाच्या आर्थिक विकासालाही चालना मिळू शकते. विशेषतः वाहन आणि मोबिलिटी क्षेत्रातील रोजगारक्षमता सुमारे तीन कोटींवरून भविष्यात दहा कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे एक ट्रिलियन डॉलर निर्यातीचे लक्ष्य हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version