घरबिजनेसभारताच्या परकीय चलनसाठ्याचा विक्रम; ७२९ अब्ज डॉलरचा टप्पा पार

भारताच्या परकीय चलनसाठ्याचा विक्रम; ७२९ अब्ज डॉलरचा टप्पा पार

आरबीआयच्या ताज्या आकडेवारीत मोठी वाढ

भारताच्या परकीय चलन साठ्याने नवा विक्रमी उच्चांक गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा तब्बल ७२९.३३ अब्ज डॉलरवर पोहोचला. एका आठवड्यात साठ्यात १२.४२ अब्ज डॉलरची मोठी वाढ झाली असून, यामुळे फेब्रुवारी २०२६ मध्ये नोंदवलेला ७२८.४९ अब्ज डॉलरचा याआधीचा विक्रमही मागे पडला आहे. विशेष म्हणजे, परकीय चलन साठ्यात सलग आठव्या आठवड्यात वाढ नोंदवण्यात आली आहे.

या वाढीमागे रिझर्व्ह बँकेने परकीय चलनाचा ओघ वाढवण्यासाठी जूनमध्ये केलेल्या उपाययोजनांचा मोठा वाटा आहे. विशेषतः परदेशातून होणारे कर्ज आणि अनिवासी भारतीयांच्या ठेवींना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने सवलतीच्या स्वॅप सुविधांसह विविध उपाय लागू केले. या योजनांमधून २१ ऑगस्टपर्यंत सुमारे ७२.८ अब्ज डॉलरचा परकीय चलन प्रवाह देशात आला असून, त्यातील तब्बल ६५.४ अब्ज डॉलर एफसीएनआर-बी ठेवींमधून आले आहेत. या मोठ्या प्रमाणातील ओघामुळे रिझर्व्ह बँकेने संबंधित सुविधा नियोजित वेळेपेक्षा एक महिना आधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
दिल्ली-एनसीआरमध्ये सीएनजी महाग

पती अमेरिकेत, पत्नी नेपाळमध्ये बेपत्ता; हेलावणारी कहाणी

वेलनेस रिट्रीटमध्ये योग-ध्यानासोबत ‘हेल्दी फूड’चीही क्रेझ!

पॅकेज्ड फूडवर आता समोरच दिसणार ‘जास्त साखर’, ‘जास्त मीठा’ची चेतावणी?

ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या परकीय चलन साठ्यातील परकीय चलन मालमत्ता ९.४८ अब्ज डॉलरने वाढून ५९१.३३ अब्ज डॉलर झाली आहे. सोन्याच्या साठ्याचे मूल्यही २.८० अब्ज डॉलरने वाढून ११४.२२ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. याशिवाय विशेष आहरण हक्क अर्थात एसडीआरचा साठा १८.८५ अब्ज डॉलर, तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतील भारताची राखीव स्थिती ४.९३ अब्ज डॉलर इतकी आहे. या मजबूत परकीय चलन साठ्यामुळे जागतिक आर्थिक अस्थिरता, तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयावरील दबावाचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेला अधिक मोठे आर्थिक बळ मिळाले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version