घरबिजनेसमक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले

मक्याचा भाव १२०० वरून २६०० रुपयांवर

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला ऊर्जा निर्मितीची जोड देण्याची गरज असल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले आहे. मक्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पूर्वी बाजारात मक्याचा दर प्रतिक्विंटल सुमारे १२०० रुपये होता. मात्र, इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची मागणी वाढल्याने हा दर आता २६०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

नागपूरमध्ये इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेत गडकरी बोलत होते. बिहार आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना मक्यापासून इथेनॉल निर्मितीमुळे तब्बल ४५ हजार कोटी रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. देशात अतिरिक्त धान्यसाठा असताना शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत शेतीमालाचा वापर इंधन निर्मितीसाठी केल्यास शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात, असे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा:
मोदींना सोन्याच्या घसरगुंडीचा दृष्टांत झाला होता का?

‘भारताची सभ्यता आणि भाषिक विविधता अद्भुत’

श्री समर्थ, विद्यार्थी, सरस्वतीची आगेकूच

जमशेद आलमने चार चेंडूंवर घेतले चार बळी

शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता, इंधनदाता आणि हायड्रोजनदाताही बनले पाहिजे, असे आवाहन गडकरी यांनी केले. भारत दरवर्षी ऊर्जेच्या आयातीवर सुमारे २२ लाख कोटी रुपये खर्च करतो. देशातच पर्यायी इंधनाची निर्मिती वाढल्यास परकीय चलनाची मोठी बचत होऊ शकते. त्याचबरोबर प्रदूषण कमी करण्यासाठीही जैवइंधन महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

यावेळी त्यांनी नागपूर महापालिकेच्या जैविक कचऱ्यापासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) तयार करणाऱ्या प्रकल्पाचे उदाहरण दिले. या प्रकल्पातून दररोज १६ टन सीबीजी तयार होत असून भविष्यात उत्पादन क्षमता ३६ टनांपर्यंत वाढवण्याचे नियोजन आहे. भाताचे काड, उसाचा बगॅस आणि अन्य जैविक कचऱ्यापासूनही इंधन निर्मिती शक्य आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी आणि उद्योजकांनी पर्यायी इंधन निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक करावी, असे आवाहनही गडकरी यांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Exit mobile version